पुणे - जिल्ह्यातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सराफा व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता जाता हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ येथे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पोलिसांच्या वेशात आलेला एका व्यक्तीने तुम्ही चोरीचे दागिने खरेदी करता, असा आरोप केला. तपासासाठी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरण्यास सांगितले. दरम्यान, पोलीस असे दागिने भरुन घेऊन जात नसल्याचे सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला उलट विचारणा केली. दरम्यान, आरोपीच्याही ते लक्षात आल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. सराफा व्यावसायिकाने त्याला पकडलेही होते. पण, चोरट्याने हवेत गोळीबार केला आणि पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या वेशात आले चोरटे, सराफाच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फसला - पुणे चोरी बातमी
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील एका सोन्या-चांदीच्या दुकान पोलिसाच्या वेशात चोरटे शिरले. तुम्ही चोरीचे दागिने खरेदी करता त्यामुळे दागिने एका पिशवीत भरुन द्या, असे चोरट्यांनी सोनाराला सांगितले. मात्र, सराफाच्या सतर्कतेमुळे तो चोर असल्याचे कळले. सराफाने त्याला पकडलेही. मात्र, त्या चोरट्याने हवेत गोळीबार करत धूम ठोकली.