पुणे - दौंड तालुक्यातील केडगावातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शांतीलाल शिलोत हे व्यापारी मित्रासोबत राहू येथून केडगावकडे जात असताना त्यांना चोरट्यांनी लुटले होते. यावेळी शिलोत यांच्याजवळील 60 हजार रुपय रक्कम ठेवलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली होती. या प्रकरणातील आरोपींच्या टोळीला यवत पोलिसांनी गजाआड केले आहे.
दत्ता अशोक शिंदे, (रा .राहूता. दौंड) स्वप्निल दत्तात्रय तळेकर, (रा . केडगाव) अक्षय सुरेश खळदकर (रा. नानगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.
काय आहे हे प्रकरण -
पिंपळगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत राहू-पिंपळगाव रस्त्यावर 12 फेब्रुवारीला संतोष शिलोत यांना 2 दुचाकीवरून आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील 60 हजारांची रोकड लुटून नेली. यानंतर संतोष शिलोत यांनी अज्ञात आरोपीविरोधात यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.