पुणे : पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांच्या घरचे आयुक्त होते. त्यांनीच तर राकेश बावधान यांना पळवले आहे. त्याच्यांच इशाऱ्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला : 5 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे महापालिकेच्या आवारामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांच्या वतीने हल्ला करण्यात आला होता. त्यावेळेस तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कोणताही तपास करण्यात आला नव्हता आता या प्रकरणाची विस्तृत माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
35 जणांच्या विरोधात गुन्हा : राकेश बावधान यांना पळविण्यात अमिताभ गुप्ता यांचाच हात होता. त्यांनीच सही करून त्यांना पाठवले होते. हे महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरून स्वतः च्या घरातील व्यक्ती सांगून याच अमिताभ गुप्ता यांनी पास दिले होते. त्यांना माहीत होत की, माझ्यावर हल्ला होणार आहे. तरी त्यांनी फालतू कलम लावले. या लोकांना घर बसल्या जामीन मिळाले. नवीन पोलीस आयुक्तांनी 35 जणांच्या विरोधात का गुन्हा दाखल केला? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
28 गुंडांची ओळख पटली : ते पुढे म्हणाले की गेल्या काही महिन्यांमध्ये या तपासात बऱ्या पैकी प्रगती झाली आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे सेनेच्या 28 गुंडांची ओळख पटली आहे. आणखी 7 आरोपींना पोलिस शोधत आहे. आत्ता उद्धव ठाकरे यांच्या या गुंडांवर लवकरच कारवाई होणार आहे. नवीन पोलीस आयुक्त यांनी यावर विशेष लक्ष दिले आहे. ते लवकरच यावर कारवाई करणार आहे, असे देखील यावेळी सोमय्या म्हणाले.
संजय राऊतांवर आरोप : यावेळी सोमय्या यांनी नवीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पुण्यातील जंबो कोविड सेंटर बाबत देखील निवेदन दिलं आहे. शिवाजी नगर येथे कोविड सेंटर होते ते संजय राऊत यांचे पाटनर सुजित पाटकर यांचे होते. याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कोयता गँग संदर्भात योजना तयार : कोयता गँगच्या संदर्भात पुण्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे. याबाबत विशेष कृती योजना तयार करत आहे. याबाबत पुणे पोलीस, गरज वाटल्यास महाराष्ट्र पोलीस देखील तयार होणार आहे असल्याचे सोमय्या म्हणाले.
हेही वाचा - Deepak Kesarkar: बाळासाहेबांनी हे कदापी सहन केले नसते केसरकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावले