ETV Bharat / state

Theft Government polytechnic Pune : शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या स्टोअररुममध्ये चोरी, जुन्या कागदपत्रांवर डल्ला - Theft office of Government

पुण्यातील शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतनच्या स्टोअररुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. २००७ ते २०१९ या दरम्यानची महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेचे संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारख्या कागदपत्रांवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे.

Theft
शासकीय दूरशिक्षण तंत्रज्ञान निकेतनच्या कार्यालयात चोरी
author img

By

Published : Jan 18, 2023, 8:03 PM IST

पुणे : पुण्यात काल रात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय दूर शिक्षण तंत्रनिकेतनच्या स्टोअर रुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००७ ते २०१९ या दरम्यानची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती मिलाळी आहे.

महत्त्वाची कागदपत्रे चोरीला : परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेचे संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे. या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड रूममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे. त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले वसतिगृह आहे.

प्रकार उघडकीस येताच पोलिसात तक्रार : या ठिकाणी एका खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेचे संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपीचे अर्ज अशी महत्त्वाची कागदपत्रे चोरली आहेत. हा सगळा प्रकार उघडकीस येताच पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली आहेत. ही कागदपत्रे जिथे ठेवण्यात आली आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. तसेच दारूच्या बाटल्या देखील असून कोणतीही सुरक्षा नसल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात : याबाबत तंत्र निकेतनच्या सहसचिव ए. आर. कायगुडे यांनी माहिती दिली की, तिथे रद्दी स्वरुपाची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. आम्ही सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात स्कॅन करून ठेवलेली आहेत. महत्वची नसलेली कागदपत्रे आम्ही तेथे ठेवली होती. ती कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती मिळताच आम्ही पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - मुलाच्या वाढदिवसानिमित्त लॉकरमधून आणलेले तब्बल शंभर तोळे सोने चोरट्यांकडून लंपास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.