ETV Bharat / state

१ जानेवारीपर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद

सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता २ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

pune
सिंहगड घाटरस्ता
author img

By

Published : Dec 2, 2019, 9:53 PM IST

पुणे - सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील महिनाभरासाठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. २ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना गडावर जायचे आहे त्यांनी पायवाटेचा वापर करावा, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाटावरील रस्त्यावर दरड कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वन विभागाच्यावतीने २ वर्षांपूर्वी दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानंतर मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र, दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या. त्यामुळे वनविभागाच्यावतीने यावर्षी जाळ्या बसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. हे काम सुरू असल्याने आज(सोमवार) पासून ते १ जानेवारीपर्यंत हा रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - पुण्यात महापोर्टलची परीक्षा रद्द; परीक्षेदरम्यान अनेकदा वीज खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा

तर, संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असताना मोठी दगडं खाली पडू शकतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाच्या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - कर्जमाफीपेक्षा हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी

Intro:एक जानेवारी पर्यंत सिंहगड घाटरस्ता पर्यटकांसाठी बंद

सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या भागात संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असल्यामुळे पुढील महिनाभरात साठी गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. दोन डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत हा सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना गडावर जायचे आहे त्यांनी पायवाटेचा वापर करावा असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाळ्यात दरवर्षी सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळतात. त्यामुळे घाट रस्ता बंद होतो आणि अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वन विभागाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे आज पासून ते 1 जानेवारीपर्यंत हा रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरू असताना मोठाले दगड खाली पडू शकता त्यामुळे पर्यटकांच्या जीवाच्या दृष्टीने हा घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.Body:..Conclusion:...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.