शिरुर (पुणे) - समाजात मुलगी नकोशी असल्याच्या घटना वारंवार घडत असताना शिक्रापुर येथील मुस्लिम कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत करत पेढे वाटून फुलांच्या पायघड्या घालत आज (दि. 17 ऑक्टोबर) घटस्थापनेच्या दिवशी घरात स्वागत केले आहे. या मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.
समाजात आजही मुलीच्या जन्माला नकोशी म्हणूनच वागवले जात असताना शिक्रापूर येथील शेख कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचे केलेले अनोखे स्वागत समाजातील प्रत्येकासाठी चांगला संदेश घेऊन आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करुन या मुलीचा संभाळ फुलासारखाच करावा, असेही आवाहन शेख कुटुंबाकडुन करण्यात आला.
हेही वाचा - पुणे : पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली कार, तिघांचा बुडून मृत्यू