पुणे - राज्यात दत्त जयंती साजरी होत असताना आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात विविध रंगाच्या फुलांनी श्री. दत्तांची रेखाकृती काढण्यात आली. संपूर्ण मंदिरासह माऊलींची समाधी हार फुलांनी साजविण्यात आली.
हेही वाचा - चोरांना पाहून पोलीस पळाले, घटना सीसीटीव्हीत कैद
आळंदीत आषाढीवारी, कार्तिकीवारी, संजीवन समाधी सोहोळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक व परंपरा जपत पार पडला होता. त्याच धर्तीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे. यासाठी मंदिर परिसर व समाधीजवळ विविध रंगाच्या फुलांनी श्री. दत्तांची प्रतिमा तयार करून जयंत्ती उत्सव साजरा होत आहे. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन आळंदी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
हेह वाचा - पुणे-नाशिक महामार्गावर हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर स्फोट