पुणे: शनिवारी रात्रीपासून टेमघर धरण क्षेत्रात ७८ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ६३ मि.मी, पानशेत धरण परिसरात ६४ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात दहा मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १७.६७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रात्री चारही धरणांत १७.१७ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी तब्बल ०.५० टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहिती नुसार बुधवारपासून खडकवासला धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाला आहे. शनिवारी या धरणातून मुठा नदीत ४७०८ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, सध्या या धरणातून २९९६ क्युसेक वेगाने मुठा नदीत, तर १००५ क्युसेकने नवीन मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा | टीएमसी | टक्क्यांत |
टेमघर | १.७३ | ४६.६२ |
वरसगाव | ७.३४ | ५७.२८ |
पानशेत | ६.६२ | ६२.२२ |
खडकवासला | १.९७ | १००.०० |
एकूण | १७.६७ | ६०.६ |