ETV Bharat / state

Flight Ticket Send To Rahul Gandhi : हिंदू महासंघाने राहुल गांधी यांना अंदमानला पाठवण्यासाठी काढले विमानाचे टिकीट - flight ticket to send Rahul Gandhi

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राहुल गांधी यांना अंदमानचे टीकटे पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर मी काय सावरकर आहे का? माफी मागायला असे विधान केले होते. त्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 28, 2023, 11:05 PM IST

हिंदू महासंघाने पाठवले राहुल गांधींना विमान टीकिट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान करत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी वक्तव्याचा प्रकरणात माफी मागावी अशी मागणी केली होती. यावर मी सावरकर नव्हे तर गांधी आहे असे, वक्तव्य राहूल गांधी यांनी केले होते. यावर हिंदू महासंघाच्या वतीने राहुल गांधी यांना अंदमानचे टीकटे पाठवण्यात येणार आहे.

flight ticket to send Rahul Gandhi
राहुल गांधी यांना अंदमानचे टीकटे पाठवण्यात येणार

राहुल गाधींना अंदमानचे तिकीट पाठवणार : यावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, जर खरे सावरकर कळायचे असेल तर माणसाने एकदा तरी अंदमानला जायला हव. म्हणून आम्ही राहील गांधी यांची अंदमानची पूर्ण तिकीट काढली असून त्यांनी एकदा तरी अंदमान येथे जाऊन त्या 8 बाय 9 च्या खोलीत त्यांनी राहावे. त्यांनी पाहावे की कशा पद्धतीने एका बॅरिस्टरने त्याग केला आहे. म्हणून आम्ही अंदमानचे तिकीट काढले असून ते त्यांना आम्ही पोस्टाने पाठवणार आहे अस, यावेळी दवे म्हणाले.

गांधी परिवारांत राहुल जन्मलेच कसे : ते पुढे म्हणाले की आज ज्या पद्धतीने राहुल गांधी हे स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बाबतीत विधाने करत आहे. ते पाहता त्यांच्यावर त्यांच्या आजींचे संस्कार झाले असते तर राहुल गांधी असे कधीच बोललेच नसते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पोस्टाचा स्टॅम्प काढणाऱ्या तसेच स्वतःच्या बँक खात्याची 11000/- ची देणगी सावरकर स्मारकला गांधी परिवाराने दिली होती. सावरकर यांच्या विषयी प्रचंड आदर लेखी व्यक्त करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या घरात तसेच वीर सावरकर यांच्या विषयी प्रेम व्यक्त करत त्यांचा लढा हा पूर्ण पणे राजकीय आहे. तुम्ही त्यांच्यासाठी जन जागृती करा मी, माझ्या पद्धतीने लढा देण्याची तयारी करतो असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. त्यांमुळे गांधी परिवारांत राहुल जन्मलेच कसे हा प्रश्न पडतो अशी खोचक टीका दवे यांनी केली.

राहुल गांधींना तिकीट मेल : राहुल गांधी यांनी अंदमानच्या 8 बाय 9 च्या काळ्या कोठडीत, 11 वर्ष राहून, एकाच भांड्यात प्रात विधी, जेवण करून, राहुन दाखवावे. अगदी आत्महत्या करण्याचे विचार मनात येऊन सुद्धा महाकाव्य लिहिणारे, तेथील कैद्यांना शिक्षण देणारे, अंधश्रद्धा घालवणारे वीर सावरकर जर समजायचे असतील तर त्यांनी अंदमानात जायला हवे. असे अव्हान हिंदू महासंघाकडून राहुल गांधी यांना देण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधींना उद्या दिनांक 28 रोजी दिल्लीहून जाण्याचे तसेच 30 मार्च रोजी येण्याच तिकीट मेल करत आहोत असे देखील यावेळी दवे म्हणाले.

हेही वाचा - Modi Most corrupt PM said Kejriwal : नरेंद्र मोदी सर्वात भ्रष्ट पंतप्रधान, केजरीवालांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.