ETV Bharat / state

दोन वर्षांपासून फरार गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद - पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, यवत पोलीस स्टेशन

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला व 2 वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. अधिक तपासासाठी या आरोपीस यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

2 वर्षांपासून फरार असलेला गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

author img

By

Published : Jun 18, 2021, 1:42 PM IST

दौंड (पुणे) - तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा केलेल्या एका आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र आरोपी दोन वर्षांपासून फरार होता. या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. अधिक तपासासाठी या आरोपीस यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

२ वर्षांपासून हा आरोपी फरार

दि. २६ मार्च २०१९ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत ट्रकला थांबवून सदर ड्रायव्हरला मारहाण करत, आरोपीने एका गव्हाच्या ट्रकवर दरोडा टाकला होता. त्यामुळे त्याच्यावर मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गून्ह्यात एकूण १० आरोपींची नावे समोर आली होती. त्यातील 9 आरोपींना काही दिवसांतच अटक करण्यात आली होती, परंतु गेल्या २ वर्षांपासून हा आरोपी फरार होता.

सापळा रचुन आरोपीस पकडले

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. सुपा घाटात दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अमोल पोपट कसबे (वय, २६ वर्षे, रा. देसाई इस्टेट, ता. बारामती) हा एका हॉटेल मध्ये काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकास मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हॉटेल समोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा आरोपीने त्याच्या मित्रांसोबत केल्याचे सांगितले आहे. यावरून आरोपीस वैद्यकीय तपासणी करून, पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - ट्यूबलेस टायरमधून चक्क गांजाची तस्करी; 30 लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.