ETV Bharat / state

कोरोनावाढीचा वेग कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील - पालिका आयुक्त - पुणे महापालिका आयुक्त बातमी

पुणे शहरात 13 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आङे. सध्या 46 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. बेड्सची संख्या अपूर पडत असल्याने पुढील पाच दिवसांत पुण्यात पन्नास व्हेंटिलेटर वाढविणार असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विक्रमकुमार
विक्रमकुमार
author img

By

Published : Apr 8, 2021, 8:12 PM IST

पुणे - शहरात 13 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. 13 फेब्रुवारीला पुण्यात 1 हजार 250 सक्रिय रुग्ण होते. आणि आता सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांचा आकडा 46 हजारांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे मागील पन्नास दिवसांत खूप वेगाने शहरात कोरोनाचा प्रसार झाला आहे. यातील समाधानाची बाब अशी की, 46 हजार पैकी 39 हजार रुग्ण घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांना फार सौम्य लक्षण आहेत. पुणे महापालिका हेल्पलाईनद्वारे अशा रुग्णांच्या संपर्कात असल्याचे पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. ते आज (दि. 8 एप्रिल) पत्रकार परिषद घेत पुण्यातील सध्याची कोरोनाची स्थिती आणि त्यावर महापालिका करत असलेल्या उपाययोजना याची माहिती दिली.

शहरातील साडेसहा हजार कोरोनाग्रस्त रुग्णालयात घेताहेत उपचार

शहरातील साडेसहा हजार कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील 550 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अंदाजे चार हजार रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. सद्यस्थितीत पुणे शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात दररोज वीस हजार जणांच्या कोरोना चाचण्या केल्या जातात. यातून दररोज साडेपाच ते सहा हजार कोरोना चे रुग्ण आढळतात. आजही शहरात रुग्ण वाढीचा वेग 26 ते 28 टक्के इतका आहे, हे चिंताजनक आहे. कोरोनावाढीचा हा वेग कमी कसा करता येईल यावर महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.

पुण्यातील बेड्सची स्थिती

कोरोना रुग्णांचा वाढत्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. 21 मार्चपर्यंत पुणे महापालिकेकडे 3 हजार 500 बेड उपलब्ध होते. यातील 2 हजार 200 बेड ऑक्सिजनयुक्त तर 290 व्हेंटिलेटरयुक्त होते. तर आज आतापर्यंत हा बेडचा आकडा वाढवून 7 हजार 500 इतका झाला आहे. यामध्ये ऑक्सीजन बेडची संख्या 4 हजार 800, व्हेंटिलेटरची संख्या 290 वरून 550 इतकी झाली आहे. या पंधरा दिवसात बेडच्या संख्येत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

येत्या पाच दिवसांत 50 व्हेंटिलेटर वाढण्यात येणार

याशिवाय जसजशी गरज लागेल त्याप्रमाणे बेड उपलब्ध केले जातील. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात असणारे ईएसआय रुग्णालय, पुणे महापालिका ताब्यात घेणार आहे. दोन दिवसांत रुग्णालयात 130 बेड तयार केले जातील. यामध्ये 70 बेड ऑक्सिजन आणि 20 आयसीयू बेड रुग्णांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय सैन्याच्या एआयसीटीएस रुग्णालयातील 20 व्हेंटिलेटर, 20 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. खासगी रुग्णलयातील बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांत 20 व्हेंटिलेटर वाढले असून पुढील 5 दिवसात 50 व्हेंटिलेटर वाढवण्यात येणार आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.