ETV Bharat / state

बारामतीत ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे - बारामती ऊसतोड कामगार मुले न्यूज

बारामती तालुक्यातील एकट्या सोमेश्वर कारखान्यावर चक्क २२२७ शाळाबाह्य मुले यावर्षी आढळून आले आहेत. तर राज्यभरातील १७३ कारखान्यांवरील शाळाबाह्य मुलांचा आढावा घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

बारामतीत ऊसतोड मजुरांची मुले गिरवताहेत शिक्षणाचे धडे

author img

By

Published : Jan 3, 2021, 1:19 PM IST

बारामती- ऊसतोड मजुरांची मुले सध्या जगभर पसरलेल्या कोरोनामुळेच शिक्षणापासून वंचित आहेत असे नव्हे तर वर्षानुवर्ष या स्थलांतरित ऊसतोड मजुरांच्या बहुतांश मुलांच्या नशिबी ऊसाचा फडच असल्याचे दिसून येते. मात्र, बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट, मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने 'आशा' प्रकल्पाच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे.

सर्वेक्षणात आढळली २२२७ शाळाबाह्य मुले..
या प्रकल्पाच्या माध्यमातून आशा प्रकल्पातील सदस्यांंमुळे सोमेश्वर कारखाना क्षेत्रातील ऊसतोड मजुरांची मुले दररोज शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यंदाच्या वर्षी राज्यभरातील गावाकडच्या शाळा बंद असल्याने सोमेश्वर कारखान्यावर मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तब्बल २ हजार २२७ शाळाबाह्य मुले 'आशा' प्रकल्पाच्या सर्वेक्षणात आढळून आली आहेत. आशा प्रकल्प सर्वेक्षणात १ हजार ८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, धुळे जळगाव, जालना, नंदुरबार , नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेशमधून सुद्धा ऊसतोड मजूर आले आहेत. मुलांच्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १२५२ तर १५ ते १८ वयाची २७० मुले असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ‘आशा' प्रकल्पाने गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी ६ ते १४ वयाची सर्वाधिक १२५२ ऊसतोड मजुरांची मुले आढळून आली आहेत.

शिक्षण विभागाने लक्ष देण्याचे गरजेचे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.