ETV Bharat / state

बारामती; नीरा कालव्यात आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह... - baramti news

पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या या दोन मुलांना नुकतेच बॉईजहोम मध्ये दाखल करण्यात आले होते.

बारामती; नीरा कालव्यात आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह...

author img

By

Published : Dec 28, 2020, 12:22 PM IST

बारामती- शहरातून नीरा डावा कालव्यात दिनेश साईनाथ भोकसे (वय १५) या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला.येथील चर्चेस ऑफ ख्राईस्टच्या बॉईजहोम मधून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यातील दिनेशचा मृतदेह सापडला असून, त्याचा सहकारी सुशांत लालासो साळवे (वय १६) अद्याप बेपत्ता आहे.

एकाचा मृतदेह सापडला-
शहरातील बॉईजहोम मधून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याची तक्रार प्रसाद गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी दिली होती. त्यातील दिनेशचा मृतदेह शनिवारी (दि २६) नीरा डावा कालव्यात आढळून आला. तर त्याचा सहकारी सुशांत साळवे हा अद्याप बेपत्ता आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

नीरा डावा कालव्यावर आढळले कपडे.....
या मुलांचा शोध घेत असताना त्यांचे कपडे नीरा डावा कालव्यावर दिसून आले. त्यामुळे ही मुले पाण्यात पोहताना वाहून गेली असावीत. असा अंदाज लावण्यात आला आहे. दिनेश भोकसे याचा मृतदेह मिळाला. पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या या दोन मुलांना नुकतेच बॉईजहोम मध्ये दाखल करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.