पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहे. मात्र, तरी आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. अंगारकीच्या निमिताने ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. या वर्षातील ही दुसरी अंगारकी चतुर्थी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. भक्तांनी गर्दी न करता ऑनलाइनच्या माध्यमातूनच बाप्पाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
लवकरात लवकर जगावर आलेले हे कोरोनारुपी संकट दूर व्हावे -
आज वर्षातील दुसरी अंगारकी चतुर्थी आहे. बाप्पाची जी काही व्रतवैकल्य करायची असतात ती आजपासून सुरू करण्याचा प्रगत आहे. खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र बाप्पाची ही अंगारकी चतुर्थी साजरी केली जातात. हे व्रत सर्वांसाठी फलदायी असते. लवकरात लवकर जगावर आलेले हे कोरोनारुपी संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली, अशी माहिती यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा - Video: "वरात निघाली महापुरात" वधू-वराचा पुराच्या पाण्यात बोटीतून गृहप्रवेश
भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरू आहेत. भाविकांसाठी अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यूृट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
भाविकांची मंदिराबाहेर गर्दी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून शासनाच्या नियमानुसार मंदिरे बंद करण्यात आली आहे. मंदिर बंद असले तरीही आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.