पुणे- येत्या तीन दिवसात जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरणार असून साधारण १३ ते १५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहील. त्याचबरोबर, दिवसा ढगाळ वातावरणाची स्थिती असेल. मात्र, पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, २७ मार्चनंतर तापमानात वाढ होणार असून विदर्भात गारांसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे, विदर्भातील तापमान कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हेही वाचा- 'मला वगळल्याचे दुःख नाही; मात्र, खडसेंना उमेदवारी द्यायला हवी होती'