ETV Bharat / state

पुण्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन; टाकाऊपासून टिकाऊ वस्तुंचे निर्माण - मुंबई बालमाता संगोपन केंद्र

विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कमी खर्चात निर्माण केल्या आणि त्या समाजासमोर मांडल्या.

pune
विज्ञान प्रदर्शनी
author img

By

Published : Jan 5, 2020, 7:17 PM IST

पुणे - राजगुरु नगर येथे जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. मुंबई बालमाता संगोपन केंद्र राजगुरु नगर यांच्या माध्यमातून या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आजचा विद्यार्थी उद्याचा संशोधक ही संकल्पना डोक्यात ठेवून या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

माहिती देताना शिक्षक आणि विद्यार्थी

प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ संकल्पनेवर आधारित विविध संशोधनाचे प्रयोग प्रदर्शनीत सादर केले. स्वच्छ व सुरक्षित गावाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ व टिकाऊ वस्तुंपासून वेगवेगळे प्रयोग तयार केले गेले. यात गावातील स्वच्छता, घनकचरा, शौचालय, सोलर, बायोगॅस, शेतीतील विविध उपक्रम, पर्जन्यमान, वातावरणातील बदल, असे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.

ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्याची क्षमता आहे. मात्र, या मुलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर हीच मुले आपल्या देशाचे भविष्य डोळ्यासमोर ठेऊन संशोधक बनतील. त्यामुळे, विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कमी खर्चात निर्माण केल्या आणि त्या समाजासमोर मांडल्या. चिमुकल्यांच्या विचारातून समोर आलेले हे उपक्रम प्रत्येक वस्ती गाव शहर येथील लोकांनी आत्मसात करण्याची गरज आहे.

हेही वाचा- 'या सरकारला पाडण्यासाठी बाहेरून कोणी काही करावं लागणार नाही'

Intro:Anc- ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आजचा विद्यार्थी उद्याचा संशोधन ही संकल्पना डोक्यात ठेवून मुंबई बालमाता संगोपन केंद्र राजगुरुनगर यांच्या माध्यमातून आज राजगुरुनगर येथे जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ विविध संशोधनाचे प्रयोग या प्रदर्शनात सादर केले

स्वच्छ व सुरक्षित गावाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी टाकाऊ व टिकाऊ वस्तु पासून वेगवेगळे प्रयोग तयार केले गावातील स्वच्छता,घनकचरा ,शौचालय, सोलर, बायोगॅस, शेतीतील विविध उपक्रम, पर्जन्यमान, वातावरणातील बदल असे विविध प्रयोग याठिकाणी या चिमुकल्या मुलांनी सादर केले

ग्रामीण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांमध्ये कला कौशल्याची क्षमता आहे मात्र या मुलांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर हीच मुले आपल्या देशाचे भविष्य डोळ्यासमोर ठेऊन संशोधक बनतील त्यामुळे विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याच मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कमी खर्चात चांगल्या संकल्पनेचा प्रयोग समाजासमोर मांडले फक्त पुढील काळात गरज आहे ती या चिमुकल्यांच्या विचारातून समोर आलेले हे उपक्रम प्रत्येक वस्ती गाव शहर येथील लोकांनी आत्मसात करण्याची खरी गरज आहे

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.