ETV Bharat / state

Teachers Day २०२३ : शिक्षक दिनानिमित्त आयुक्त आणि विद्यार्थ्यांची अदलाबदली! पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम - happy Teachers Day

Teachers Day 2023 : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनं एक अनोखा उपक्रम राबवला. महापालिकेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भूमिका निभावली. तर आयुक्त एका दिवसासाठी शाळेतील शिक्षक बनले होते. वाचा ही बातमी..

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 8:47 AM IST

Updated : Sep 5, 2023, 8:57 AM IST

आयुक्त शेखर सिंह

पिंपरी-चिंचवड Teachers Day 2023 : पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची गाडी आली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून महापालिका शाळेतील दोन विद्यार्थी उतरले. त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सॅल्युट केलं. हे दृश्य होतं महापालिका आयुक्तांची भूमिका बजावणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागताचं!

पहा विद्यार्थी काय म्हणाले

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणी नगर प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थी करण काकडे आणि काळेवाडी येथील दत्तोबा रामचंद्र काळे शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी अपेक्षा माळी या दोघांनी महापालिका आयुक्तांची भूमिका निभावली. यावेळी त्यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन सूचना देखील दिल्या. या बैठकीस सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.

Teachers Day 2023
विद्यार्थी एका दिवसासाठी बनले पालिका आयुक्त

आयुक्तांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली : यानंतर दोन्ही विद्यार्थीं आयुक्तांनी संत तुकाराम नगर येथील अग्निशमन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते, अग्निशमन विभागाची जनतेला कशी मदत मिळते याबाबत प्रात्याक्षिक पाहिले. तसेच त्यांनी तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत देखील चर्चा केली. विशेष म्हणजे, एकीकडे विद्यार्थ्यांनी महापालिका आयुक्तांची भूमिका निभावली, तर दुसरीकडे आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये जावून शिक्षकाची भूमिका पार पाडली.

हेही वाचा : Teachers Day २०२३ : शिक्षक दिनाचा काय आहे इतिहास? कोणत्या देशात कधी साजरा केला जातो? घ्या जाणून...

आयुक्त शेखर सिंह यांनी आपला अनुभव मांडला : यानंतर बोलताना आयुक्त शेखर सिंह यांनी आपला अनुभव मांडला. 'जॉब स्विच' उपक्रमांतर्गत मी आज एका शिक्षकाची भूमिका पार पाडली, तर विद्यार्थ्यांनी माझ्या कार्यालयात जाऊन आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली. महापालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत शिकवत असताना मी विद्यार्थ्यांना चंद्रयानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थी भविष्यात इस्रोचा भाग कसे बनू शकतात, तसेच ते वैमानिक किंवा अभियंता कसे होऊ शकतात याबद्दल त्यांनी मला प्रश्न विचारले. विशेषतः मुलींना हे करिअर स्वीकारण्याची आवड आहे, हे पाहून मला आनंद वाटला', असं आयुक्त म्हणाले.

या अनुभवानं खूप शिकायला मिळालं - आयुक्त : 'आकांशा शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी माझे शिक्षण, छंद, आवडते शिक्षक यांसारखे काही वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना मला खूप आनंद झाला', असं आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. या अनुभवानं मलाही विचार करण्यासारखे काही प्रश्न जाणवले, ज्यावरून शहरातील एकूण शिक्षण पद्धतीवर काय बदल करता येतील याबाबत मला काही कल्पना सुचल्या असल्याचं आयुक्त सिंह म्हणाले.

हेही वाचा : Teachers Day २०२३ : माळावर नंदनवन फुलवलं; विद्यार्थ्यांनाही दिलं शेतीचं शिक्षण, 'त्या' शिक्षकाची प्रेरणादायी कहाणी

Last Updated : Sep 5, 2023, 8:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.