ETV Bharat / state

तमाशाची पंढरी असणाऱ्या नारायणगावात रंगली यात्रा; तमाशा शौकीनांची गर्दी - पंढरी

नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानची यात्रा १ मे पासून सुरू झाली आहे. तमाशा फडमालकांच्या हजेरीने ही यात्रा तब्बल ८ दिवस यात्रा रंगते.

तमाशाची पंढरी म्हणुन ओळख असणा-या नारायणगावात यात्रा रंगली
author img

By

Published : May 4, 2019, 3:12 PM IST

Updated : May 4, 2019, 8:31 PM IST

पुणे- जिल्ह्यातील नारायणगाव हे तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखले जाते. तमाशा सम्राज्ञी आणि फडमालक दिवंगत विठाबाई भाऊ मांग या देखील याच गावातील आहेत. येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानची यात्रा १ मे पासून सुरू झाली आहे. तमाशा फडमालकांच्या हजेरीने ही यात्रा तब्बल ८ दिवस यात्रा रंगते. यात्रेला आणि येथील फुक्कट तमाशाच्या बारीला अनेक तमाशा शौकीन गर्दी करत आहेत.

येथे कोणतेही मानधन न घेता तमाशा होतो. या ठिकाणी जी बारी वरचढ ठरते त्या बारीला राज्यभर मागणी असते. शिवाय बिदागी पण चांगली मिळते. यात्राकाळात रोज रात्री १०च्या नंतर नामांकित फडमालक आपल्या तमाशा-बारीचे सादरीकरण करतात. कलावंतांचा मोठा संच, विद्युत रोशनाई, मिमिक्री, लावण्यांसोबतच हिंदी मराठी ऑर्केस्ट्रातील गाण्याची बेधुंद गाणी, एक से बढकर एक नर्तकींच्या ठेक्यावर येथे रात्र बहरते. याठिकाणी तमाशाफड मालकांना, कलावंताना आणि यात्रेकरूंना सर्व सोयी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या जातात.

यात्रोत्सवात ढोलताशा पथकांच्या गजरात घागरींची आकर्षण मिरवणुकीत निघते. परिसरातील नामांकित ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतात. यात्रेनिमित्त एलईडी दिव्यांचा वापर करून नेत्रदीपक विद्युतरोषणाई करण्यात येते. तसेच शोभेच्या दारुकामासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. मागील ४० वर्षापासून हे शोभेचे दारूकाम या यात्रेचे आकर्षण ठरत आहे. नारायणगाव येथील "मुस्लिम कुटुंबातील आतार आणि मनियार बंधू" दरवर्षी मोफत पणे ही सेवा ते या ठिकाणी सादर करतात. राज्यातील सर्वात मोठी आणि तमाशा कालावंतांच्या माहेरघरातील तमाशाची ही यात्रा आपल्या परंपरा जपत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन करुन देत आहे.

Intro:Anc__ तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानची यात्रा १ मे पासून सुरु झालीय..! तमाशा कलावंतांचे माहेरघर असलेल्या यात्रेला आणि येथील फुक्कट तमाशाच्या बारीला अनेक तमाशा शौकीन गर्दी करत आहेत. पाहणार आहोत तमाशा पंढरीच्या यात्रेतून एक स्पेशल रिपोर्ट

VO__नारायणगाव....! तमाशा कलावंत आणि फडमालक असलेल्या तमाशा साम्रादनी कै.विठाबाई भाऊ मांग यांचं हे गाव....राज्यभरातील तमाशा कलावंतांचे माहेरघर म्हणूनही या गावची ओळख आहे ....येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानचा यात्रोत्सव नुकताच सुरु झाला आहे.तब्बल ८ दिवस या ठिकाणची यात्रा रंगते ती नावाजलेल्या तमाशा फडमालकांच्या हजेरीनं..! इथं तमाशा होतो तो कोणतेही मानधन न घेता.या ठिकाणी जी बारी वरचढ ठरते त्या बारीला राज्यभर मागणी असते शिवाय बिदागी पण चांगली मिळतेय

Byte__रघुवीर खेडकर__तमाशाफडमालक

Byte__संभाजी जाधव __तमाशाफडमालक

Byte__ -मंदारानी__तमाशाफडमालक

VO__यात्राकाळात रोज रात्री १० च्या नंतर नामांकित फडमालक आपल्या तमाशाबारीची इथं सादरीकरण करतात. कलावंतांचा मोठा संच,विद्युत रोशनाई आणि मिमिक्री सोबत लावण्या,हिंदी मराठी ओर्केस्टातील गाण्याची बेधुंद गाणी एक से बढकर एक नर्तकींच्या ठेक्यावर रात्रभर इथे बहरली जाते. यात्रेला उपस्थित राहणाऱ्या तमाशा तमाशाफड मालकांना,कलावंताना आणि यात्रेकरूंना या ठिकाणी सर्व सोयी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या आहेत.नारायणगाव ग्रामस्थांना तमाशा कालावंताचा यामुळे मोठा अभिमानच आहे.

Byte__योगेश पाटे__सरपंच नारायणगाव

Byte__ संतोष खैरे __अध्यक्ष -यात्रा कमेटी

Byte__ भुजबळ के डी __ ग्रामस्थ

VO__ यात्रोत्सवात मिरवणुकीत आकर्षण असते ते ढोलताशा पथकांच्या गजराचा आणि घागरींचा. परिसरातील नामांकित ढोलताशा पथके मिरवणुकीत सहभागी होतात.यासोबत यात्रोत्सवात आकर्षण आहे ते येथील मंदिर आणि परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईचे.एलईडी दिव्यांचा वापर करून यंदाहि नेत्रदीपक विद्युतरोषणाई उभारण्यात आली आहे. यासोबत नारायणगावची हि यात्रा प्रसिद्ध आहे ती शोभेच्या दारुकामामुळे.मागील ४० वर्षापासून हे शोभेचे दारूकाम या यात्रेचे आकर्षण ठरत असून राज्यभरातील तमाशा शौकीन हा अविष्कार पाहण्यासाठी इथे गर्दी करत असतात.नारायणगाव येथील "मुस्लिम कुटुंबातील आतार आणि मनियार बंधू" दरवषी मोफत पणे हि सेवा ते या ठिकाणी सादर करतात...

Byte__आरिफ आतार, दारूकाम करणारे कारागीर

VO__ तर अशी आहे हि राज्यातील सर्वात मोठी आणि तमाशा कालावंतांचं माहेरघर असलेली तमाशाची यात्रा.आपल्या परंपरा जपत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन करुन देत आहे.
Body:स्पेशल पँकेज स्टोरीConclusion:
Last Updated : May 4, 2019, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.