पुणे- येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार शक्य होणार आहेत. प्रशासनाने ५०० विलगीकरण आणि ३० अतिदक्षता बेड्स उपलब्ध होणार असल्याचे कळवले आहे .
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिकेने सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत करार केला आहे. यामुळे कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत. पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील रूगणालय आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय जर कमी पडले, तर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना दाखल केले जाणार आहे.