पुणे - कोरेगाव-भिमा येथील पुणे नगर महामार्गावर रात्री 9 च्या सुमारास स्विफ्ट कार व स्कॉर्पियो यांच्या दरम्यान भिषण अपघात झाला. अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अनेक दिवसांपासून पुणे - नगर महामार्गावर वाहतुककोंडी व अपघातांचे प्रमाण वाढत चालले असताना अनेक वेळा अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. मात्र, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अशा अपघातांच्या भयानक घटनांचा सामना करावा लागत आहे.
पुण्याकडून शिरूरच्या दिशेने स्विप्ट कार आणि समोरुन येणाऱ्या स्कॉर्पियो गाडीची कोरेगाव-भिमा येथील कल्याणी फाट्यावर समोरा समोर जोरदार धडक झाली. या अपघात स्विप्ट चालक नामदेव घावटे, स्कॉर्पियो मधील किरण जाधव, विठ्ठल बेलोटे, सुभाष आवटे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कोरेगांव भिमा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे. स्कॉर्पियो मधील सर्वजण पारनेर तालुक्यातील रहिवाशी आहेत, तर स्विफ्ट चालक शिरूर मधील रहिवाशी आहेत. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.