पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यबद्द्ल अवमानकारक शब्द (Derogatory words about Chhatrapati Shivaji Maharaj) वापरून छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केल्याचा निषेधार्थ आज मंगळवारी सकाळी निघालेल्या मुकमोर्चात तब्बल 1 लाख हून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आजचा पुणे बंद कडकडीत झाला असला तरी आत्ता पुण्यात चर्चा सुरू झाली आहे. खासदार उदयनराजे यांनी सभेत न केलेल्या भाषणाची याचाच धागा धरत शिवसेना नेत्या सुषमा सुषमा अंधारे यांनी उदयनराजे यांना टोला लगावत बहुतेक त्यांना आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला जायचं होतं म्हणून त्यांनी सभेत भाषण केले नाही असा टोला यावेळी अंधारे यांनी उदयनराजे यांना लगावला.
लाखोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हटाव या मागणी साठी सर्व पक्षीय तसेच विविध संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या पुणे बंद यशस्वी झाला आहे. आज सकाळी खासदार उदयनराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चा लाखोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. मात्र लाल महल येथे मोर्चा समाप्तीनंतर खासदार उदयनराजे यांनी लहान महाल येथे भेट देत तसेच मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला संबोधित न करताच निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आला आहे. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार उदयनराजे यांनी भाषण न केल्याने त्यांना टोला लागलेला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे.