ETV Bharat / state

राजनाथ सिंह यांच्या 'त्या' वक्तव्याबाबत सुशीलकुमार शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

उदय माहूरकर आणि चिरायु पंडित यांनी लिहिलेल्या 'वीर सावरकर हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या दिल्लीत झालेल्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केल आहे. मात्र काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बहुतेक सावरकरांनी राजनाथ सिंह यांना बैठकीत सांगितले असावे, असे म्हणत त्यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.

सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे
author img

By

Published : Oct 13, 2021, 7:53 PM IST

Updated : Oct 13, 2021, 8:10 PM IST

पुणे - विनायक दामोदर सावरकर यांनी मागितलेल्या माफीचं प्रकरण एका विशिष्ट वर्गाने चुकीच्या पद्धतीने पसरवले असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असताना सावरकरांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून माफी मागितली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादांना सुरुवात झाली आहे. अनेक नेते, इतिहास तज्ज्ञ आणि पत्रकार याविषयी मत मांडत आहेत. उदय माहूरकर आणि चिरायु पंडित यांनी लिहिलेल्या 'वीर सावरकर हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या दिल्लीत झालेल्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केल आहे. मात्र काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बहुतेक सावरकरांनी राजनाथ सिंह यांना बैठकीत सांगितले असावे, असे म्हणत त्यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया

राजनाथ सिंहाचे विधान

सावरकर यांच्याविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आलेल्या आहेत. सावरकर यांनी अंदमान निकोबार तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे पसरवण्यात आले. मात्र, त्यांनी सुटकेसाठी दया याचिका दाखल केल्या नाही. सामान्यपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. महात्मा गांधी यांनी सावरकर यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती, असे राजनाथ सिंह म्हणाले. वीर सावरकर महान स्वतंत्रता सेनानी होते. त्यांना एका विशिष्ट विचारधारेच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. असे केल्यास त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल. त्यांचा अपमान करणे क्षमा योग्य नाही. वीर सावरकर महानायक होते आणि भविष्यातही राहतील. ब्रिटिशांनी त्यांना दोनदा ना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यावरून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छा शक्ती किती मजबूत होती. हे दिसून येते. काही लोक त्यांच्यावर नाझीवाद, फॅसिस्ट असल्याचा आरोप करते. मात्र, सत्य हे आहे, की असे आरोप करणारे लोक लेनिनवादी, मार्क्सवादी विचारधाराने प्रभावीत होते आणि अद्यापही आहेत. सरळ शब्दात सांगायचे झाले तर सावरकर 'यथार्थवादी' आणि 'राष्ट्रवादी' होते. ते बोल्शेविक क्रांतीसोबतच लोकशाहीबद्दल बोलत, असे राजनाथ सिंह म्हणाले. हिंदुत्वाबद्दल सावरकरांचे विचार हे भारताच्या भौगोलिक स्थान आणि संस्कृतीशी संबंधित होते. त्यांच्यासाठी हिंदू हा शब्द कोणत्याही धर्म, पंथाशी संबंधित नव्हता. तर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित होता. या विचारावर कोणी आक्षेप घेऊ शकतो. मात्र, विचाराच्या आधारावर तिरस्कार करणे योग्य नाही, असे सिंह म्हणाले.

हेही वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह

Last Updated : Oct 13, 2021, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.