ETV Bharat / state

Supriya Sule : छगन भुजबळांचे आरोप, भाजपाची ऑफर अन् पहाटेचा शपथविधी... वाचा सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट - भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर

Supriya Sule Press conference : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गट आणि छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी शरद पवार गटावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

Supriya Sule Press conference
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 3:36 PM IST

Updated : Oct 12, 2023, 4:18 PM IST

पुणे Supriya Sule Press conference : मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अनेक आरोप केले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर अन् पहाटेचा शपथविधी यासंदर्भातही गौप्यस्फोट केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : 'हो, मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव आला होता. पण मला ते अस्वस्थ करणारं होतं. कारण यात तीन गोष्टी होत्या एक तर पवारांना कधीही भाजपाबरोबर जायचं नव्हतं आणि दुसरं कारण म्हणजे आमची वैचारिक गोष्ट ही चव्हाण साहेब आणि पवार साहेबांची आहे. आणि मी माझी विचारधारा सोडणार नाही. जर मी अध्यक्ष झाले असते तर पहिलाच निर्णय हा भाजपासोबत जाण्याचा होता. आणि ते करणं मला अशक्य होतं. एका बाजूला सत्ता होती तर दुसऱ्या बाजूला संघर्ष', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भुजबळांच्या आरोपाबाबत दिली प्रतिक्रिया : 'काल भुजबळ यांनी कबुली दिली की पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी हे दोन्ही शरद पवार यांना अंधारात ठेवून घेण्यात आले. आता हे स्पष्ट आहे की या दोन्ही शपथविधीबाबत पवारांना माहीत नव्हतं. पवारांनी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलेलं नाही. तसंच एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारी असल्याची टीका होत आहे. मग आमच्याबरोबर येण्यासाठी इतके वर्ष का चर्चा करत होते. याचाच अर्थ आमच्यावर जे आरोप ते करताय ते खोटे आहेत. आणि त्यांनी याबाबत माफी माघायला हवी.'

शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत देखील केले भाष्य : सुळे म्हणाल्या की, 'पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता. तो त्यांना द्यायचाच नव्हता. पण यांचा भाजपा बरोबर जाण्यासाठीचा जो आग्रह होता. यामुळे त्यांचे मन दुखावले आणि त्यांनी तो राजीनामा दिला. पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो राजीनामा परत घेतला. मात्र जे आज भुजबळ सांगत आहे की शरद पवार हे एकतर्फी निर्णय घेत होते. तर मग जेव्हा पवारांनी राजीनामा दिला तेव्हा जी समिती स्थापन करण्यात आली होती, तेव्हा भुजबळ यांनीच विरोध केला होता. त्यामुळे तानाशाह कोण होते? तसंच त्यांनी त्यांच्या मुलाखतीत चारवेळा सांगितलय की जेव्हा-जेव्हा आम्ही शरद पवार यांना भेटलो तेव्हा-तेव्हा त्यांनी आम्हाला मी माझी विचारधारा सोडणार नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असंच सांगितलं.'

हेही वाचा -

  1. Supriya Sule : अजित पवारांचा गट कोण चालवतंय? सुप्रिया सुळेंनी थेटच सांगितलं...
  2. Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या ८३ व्या वर्षी व्यक्तीला घराबाहेर काढण्याची ही कुठली मराठी संस्कृती सुप्रिया सुळेंचा सवाल
  3. Supriya Sule On Nanded Patients Death Case : नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, 'सरकारच्या हलगर्जीमुळेच...'

Last Updated : Oct 12, 2023, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.