पुणे: खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हणाल्या की, अशावेळी मला, तुकाराम महाराज आठवतात. तुकाराम महाराजांनी 700 वर्षांपूर्वी सांगितला आहे. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, देवाचे म्हणणं आहे की, देवाच्या दारात एक क्षण जरी उभा राहिला तर ते पुरेसा आहे. तुम्ही कृती करा ,कर्तव्य करा ,लोकांची सेवा करा, हरी मुखे म्हणा मुखातून हरी म्हटले तरी बस आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
शेतकरी अडचणीत आहे: मुख्यमंत्री गेले असतील तर त्यांना शुभेच्छाच आहेत. परंतु हे दुर्दैव आहे. ज्या काळामध्ये तुम्ही राज्याच्या मोठ्या पदावर आहात. कर्ते धर्ते आहात तुम्ही या राज्याचे आणि ज्या काळात शेतकरी अडचणीत आला आहे. गरीब व कष्ट करणारे अडचणीत आले आहेत. मी पाहिले कुणाचे टेस्टिंग चालू आहे. कुणाचे जेवण चालू आहे. सगळे एकमेकांना विचारत आहेत. जेवण उत्तम होते, मला आनंद आहे. जेवण उत्तम असल्याचे, पण थोडेसे टायमिंग पुढे गेला असता तर बरे झाले असते.
कुणाच्या पोटात काही दुखत नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की, विरोधकांच्या पोटात आमच्या दौऱ्याला मिळणाऱ्या पाठिंबामुळे पोटात दुखत आहे. कुणाच्या पोटात काही दुखत नाही. त्याला मोठ्या मनाचे लागते. 35 वर्षांपूर्वी शरद पवार हे जेव्हा भूकंप झाला तेव्हा सगळे मंत्रालय शिफ्ट करून उस्मानाबादला फिल्डवर काम करत होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. अशा अनेक लोकांनी हा इतिहास तयार केले, असे सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.
माझे कोणासोबत किती संबंध आहेत: यावेळी शरद पवार आणि पवार फॅमिली भाजपाच्या जवळ जात आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे कोणासोबत किती संबंध आहेत हे सगळं समाज माध्यमावर सगळ्यांना दिसेल. फक्त एक शरद पवारांच्या एका वक्तव्यावर हे जे बोलले जाते त्याबद्दल मी स्पष्ट सांगते. संजय राऊत यांच्यासाठी जी कमिटी नेमली त्या कमिटीमध्ये सगळ्यात जास्त सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत. म्हणून एक निष्पक्ष न्यायालयीन चौकशी व्हावी एवढीच भूमिका शरद पवार साहेबांनी मांडली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास: आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना सुद्धा असे बंड होण्याची शक्यता होती. याची तुम्हाला कल्पना होती का या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर मी इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाचते. त्यामुळे बाकीच्या इतिहासाचा प्रश्न नाही. आजचे वास्तवातले प्रश्न मांडणे हे गरजेचे आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकटात आहे त्यावर बोललेले बरे. पाच वर्षांपूर्वी काय झाले, आठ वर्षापूर्वी काय झाले यात मला काही स्वार्थ नाही. इतिहास वाचायचीही गरज नसल्याचे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण असताना असे बंड आघाडीत सुद्धा होणार असल्याची चर्चा होती, त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. 2024 मध्ये सुद्धा महाविकास आघाडी भक्कम राहील चंद्रकांत पाटील यांच्याकडे दुसरी कुठली माहिती असेल, तर मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर केली आहे.चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की महाविकास आघाडी एकत्र राहण्याची शक्यता फार कमी आहे.