ETV Bharat / state

खासदार सुप्रिया सुळेंकडून रोजगार हमीच्या कामांची पाहाणी, मजुरांशी साधला संवाद

तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत अंजनगाव ते जळगाव सुपे रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अचानक भेट देत मजुरांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. सोबतच चालू असलेल्या रस्त्याच्या कामाचे कौतुक केले.

author img

By

Published : Jun 17, 2020, 7:25 PM IST

Supriya Sule inspects roads in baramati
सुप्रिया सुळेंकडून रोजगार हमीच्या कामांची पाहणी

बारामती (पुणे) - तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत अंजनगाव ते जळगाव सुपे रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अचानक भेट देत मजुरांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. याठिकाणी २२६ मजूर काम करीत आहेत. खासदार सुळे यांनी या कामाची पाहाणी केली.

पाहाणीदरम्यान सुळे यांनी कामगारांनी काही प्रश्न विचारले. यावेळी सुळे यांनी काम कसे चालले आहे? पगार वेळेवर होतात का? कामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जातो का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेता का? अशी विचारपूस केली. सोबतच चालू असणाऱ्या रस्त्याच्या कामाचे कौतुक केले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, उपसभापती प्रदीप धापटे, सरपंच अंजना खोमणे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.