ETV Bharat / state

खा. सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार - सुप्रिया सुळे

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमात सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी संसदरत्न पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात येईल.

author img

By

Published : Mar 18, 2021, 10:19 PM IST

बारामती – चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २० मार्चला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी संसदरत्न पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात येईल.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार देण्यात येतो.माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले. सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फौंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या बरोबरच चालू सतराव्या लोकसभेत ही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ८९ टक्के उपस्थिती लावत १२२ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण २८६ प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना सलग सहा वेळेस संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.