ETV Bharat / state

Supriya Sule News: सत्ताधारी पक्षाचे मंत्री दगड मारण्याची भाषा करत असतील तर...सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर निशाणा - सुप्रिया सुळेंची गुलाबराव पाटलांवर प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आज जळगाव जिल्ह्यात सभा आहे. या सभेच्या आधीच राजकीय वार प्रत्यावर होताना दिसत होते. स्वतः मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी सभेत दगड मारून सभा उद्धस्त करू, अशी भाषा केली होती. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

MP Supriya Sule
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Apr 23, 2023, 12:12 PM IST

राजकारण हे काल्पनिक नसून ते वास्तव असते- खासदार, सुप्रिया सुळे

पुणे : खासदार सुप्रिया सुळे पवार म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचा आमदार मंत्री जर दगड मारण्याची भाषा करत असतील, तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. याबद्दल देवेंद्र फडवणीस यांच्याकडून गृहमंत्री म्हणून सुद्धा मला जास्त अपेक्षा नाही. परंतु महाराष्ट्राची कायदा व्यवस्था किती बिघडली आहे, हे याचे उदाहरण असल्याची टिका सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांना संसदेमध्ये भेटेल. याची चर्चा करणार आहे. कारण देवेंद्र फडवणीस यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्याची मला गरज सध्या वाटत नाही. परंतु मी त्यांनाही एक वेळ बोलेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काल्पनिक गोष्टी रंगवण्यात अर्थ नाही : त्याचबरोबर राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की या संदर्भामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी बोलल्या जातात. राजकारण हे काल्पनिक नसून ते वास्तव असते. त्यामुळे आमच्या पक्षाचे लोक आमचे प्रवक्ते याविषयी जास्त बोलतील, असे स्वतः अजित पवार यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे अशा गॉसिप करण्यात काहीही अर्थ नाही. राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. मी माझ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे याचा विचार करायची मला गरज नाही. पण योग्य वेळ आल्यानंतर आम्ही सर्वजण याविषयी बोलू. पण आता विनाकारण काल्पनिक गोष्टी रंगवण्यात अर्थ नाही. त्या रंगवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.

सभेला एकनाथ खडसे उपस्थित राहणार : उद्धव ठाकरे यांच्या सभेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी फक्त महाविकास आघाडीच्या सभेलाच सर्व पक्ष नेते उपस्थित राहत होते. परंतु ही पहिली सभा आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे जाणार आहेत. मंचावर ते असणार आहेत. यावर बोलताना एखाद्या आघाडीतल्या घटक पक्षाने जर निमंत्रण दिले, तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. त्यात वावगे काय आहे? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. तसेच यापुढे तुम्ही बघत राहा, कुठल्या सभेला कुठले नेते राहतील, असे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांच्या सभेला राष्ट्रवादीचे त्याच्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Atul Londhe On BJP : भाजप सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा वरवंटा आदिवासी बांधवांवर - अतुल लोंढे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.