ETV Bharat / state

शरद पवार 'फिल्डवर'चे नेते, म्हणूनच ते 'फिल्डवर' असतात, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - फिल्ड

फडणवीस यांचा आवडता शब्द 'पारदर्शक' आहे. मग पारदर्शकताच पाहिजे असेल तर ईव्हीएम वापरू नका, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : May 14, 2019, 3:33 PM IST

पुणे - शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे मत मांडताना

पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी सुळे यांच्या हस्ते डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मिरवणूकही काढण्यात आली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

ईव्हीएमवर शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. फडणवीस यांचा आवडता शब्द 'पारदर्शक' आहे. मग पारदर्शकताच पाहिजे असेल तर ईव्हीएम वापरू नका, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Intro:शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असे म्हणत फोन वरून दुष्काळाची माहिती घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. Body:पुण्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात पार पडली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानतंर मिरवणुकही काढण्यात आली. मिरवणुकीत विविध प्रात्यक्षिके मुलांनी सादर करत मिरवणुकीची शोभा वाढविली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. Conclusion:इव्हीएमवर शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, evm नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे. मग पारदर्शकताच पाहिजे असेल तर ईव्हीएम वापरू नका असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.