पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar Chitra Wagh Dispute) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे ( Supriya Sule Appeal To Devendra Fadnavis ) यांची एन्ट्री झाली आहे. यावादावर सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन हा वाद थांबवण्याची विनंती केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हे राजकारण थांबवावे. त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही करतो. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा पुढाकार घेऊन हे थांबवा, अशी माझी विनंती असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे.
राज्य महिला आयोग आपले काम करते राज्य महिला आयोग ( State Commission for Women ) आपले काम करत आहे. आयोग काहीच करत नाही असा आरोप भाजच्या नेत्या चित्रा वाघ करत आहेत. हे प्रत्येक पक्षाने आपापल्या व्यासपीठावरून थांबवायला हवे. तसेच अनेक महिला नेत्यांवरती सुद्धा आरोप होत आहेत. हे थांबवणे हे गरजेचे आहे. हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद ( Urfi Javed Raw ) वाद उफाळला. त्यानंतर रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ ( Chitra wagh Rupali Chakankar Dispute ) यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद आपण कुठल्या पातळीला नेणार आहोत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
अजित पवारांना टार्गेट केले जाते सुप्रिया सुळे यांनी अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते वाटत आहेत, असे सध्या तरी चित्र आहे. त्यांची लोकप्रियता जास्त असल्यामुळे त्यांची सुरक्षा सुद्धा वाढवली असेल, असे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. लोकप्रियता जास्त असल्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना टार्गेट केले जाते, असेही त्या म्हणाल्या.
सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलत नाहीत सीमा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. मी अमित शहा यांना भेटल्यानंतर त्यांचे आभार सुद्धा मानले. त्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री आणखी वादग्रस्त बोलत आहेत. परंतु आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलत नाहीत. मला असे कुठेतरी वाटते की महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी एखादी अदृश्य शक्ती काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प आहेत, असे म्हणत त्यांनी सीमा प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. आम्हाला महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे, आम्ही हे चालू देणार नाही असे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीची बैठक पुण्यातील खडकवासला मतदार संघांमध्ये राष्ट्रवादीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उपस्थिती लावून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. पक्षाची तयारी सुद्धा जाणून त्यांनी घेतली आहे.