पुणे Sunil Tatkare On Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक खासदार आणि एक आमदार हे अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहा तारखेला जेव्हा निकाल लागेल, निवडणूक आयोग जो काही निर्णय घेईल, तेव्हा तुम्हा सर्वांना कळेल ते कोण आहेत अशी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्हीच राष्ट्रवादी असल्याचे दावे करण्यात आले आहेत.
सिंचन घोटाळ्याची चौकशी : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले की, त्यावेळी मी सभागृहात होतो. ज्याप्रमाणे 2014 ला कुठलीही अट न घालता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले, पुण्यात आले. अनेक वेळा एकत्र कार्यक्रम झाले. त्या सगळ्याचा दिनक्रम बघून त्याचीही चौकशी करावी, मग कळेल अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलीय. (Supriya Sules statement on irrigation scam)
गणेश चरणी प्रार्थना : राष्ट्रवादीच्या बंडानंतर बारामतीतून पार्थ पवार लढणार, अशी चर्चा आहे. यावर बोलताना निवडणुकांमध्ये लढावं लागतं, परंतु आम्ही आमच्या मित्र पक्षाशी चर्चा करू. त्यानंतर त्या संदर्भात आमचे सर्वोच्च नेते अजित पवार बारामतीचा उमेदवार ठरवतील, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलीय. पुण्यातील गणेश मंडळाच्या दर्शनासाठी सुनील तटकरे आज पुण्यात आले आहेत. आमचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, हीच गणेश चरणी प्रार्थना केलीय. दरवर्षी येतो, त्याप्रमाणे याही वर्षी गणेश मंडळाला आलोय, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. आज ते अखिल मंडळी गणेश मंडळाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा :
- Sunil Tatkare Press Conference: निवडणूक आयोग आम्ही घेतलेल्या निर्णयावरच शिक्कामोर्तब करेल - सुनील तटकरे
- Sunil Tatkare On INDIA: आपण 'इंडिया माता' म्हणत नाही... सुनील तटकरेंचा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा
- Sunil Tatkare : अजित पवार राष्ट्रीय नेते अन् शरद पवार कोण? सुनील तटकरे यांच्याकडे नाही उत्तर