पुणे: विजय याने सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाच्या अभ्यासिकेत आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मॉडर्न महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. यापूर्वी त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळ्यात विद्यार्थिनीची आत्महत्या: धुळे जिल्ह्यातील निमडाळे येथे विद्यार्थिनीने वसतिगृहामध्ये आत्महत्या केल्याची घटना डिसेंबर, 2019 रोजी घडली होती. प्रियांका अहिरे, असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आनंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलींचे बालगृह याठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकत होती.
अभ्यास करण्याच्या बहाण्याने केली आत्महत्या: मला अभ्यास करायचा आहे. तुम्ही बाहेर जा, असे सांगत प्रियांकाने वसतिगृहात आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यामुळे तिच्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. शंका आल्याने तेथील महिला अध्यक्ष यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रियांकाने आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागील कारण अद्यापही समजू शकले नाही. मात्र, यानिमित्ताने वसतिगृहातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
बिहारमध्ये वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या: बिहार राज्यातील रांची येथील नागडी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या आयआयएम संस्थेच्या वसतिगृहात शिवम पांडे नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह जानेवारी, 2023 रोजी सापडला होता. शिवमचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. खून आणि आत्महत्या या दोन्ही मुद्द्यांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस वसतिगृहात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. शिवम हा बनारस, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.
हेही वाचा:
- Rahul Gandhi : मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींना हजर राहण्यापासून सूट, 4 जुलै रोजी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
- Ajit Pawar on MLAs Disqualified : सोळा आमदार अपात्र झाले तरीही सरकारला कोणताच धोका नाही; विधानानंतर अजित पवार पुन्हा चर्चेत
- Sanjay Raut FIR : ...म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप