ETV Bharat / state

पिंपरी ते फुगेवाडी मार्गावरील पुणे मेट्रोची चाचणी यशस्वी - Mahametro Pune test

१० जानेवारी २०२० रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. बरोबर एक वर्षांनी आज दुसरी चाचणी घेण्यात आली.

Pimpri to Phugewadi Metro Test
पिंपरी ते फुगेवाडी मार्गावरील पुणे मेट्रोची चाचणी यशस्वी
author img

By

Published : Jan 3, 2021, 8:10 PM IST

पुणे - पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ % काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. १० जानेवारी २०२० रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या १ किमी मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. बरोबर एक वर्षांनी आज दुसरी चाचणी घेण्यात आली.

मेट्रोचे दृष्य

हेही वाचा - औरंगाबादच्या नामांतरावरून प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

कोरोनामुळे ६ ते ७ महिने कामाचा वेग बाधित झाला होता. या चाचणीसाठी आज पीसीएमसी ते फुगेवाडी या साधारणतः ६ किमी मार्गावर मेट्रो ट्रेन धावली. दुपारी १ वाजता ३० मिनिटानी मेट्रो ट्रेन पीसीएमसी स्थानकावरून सुटली व दुपारी २ वाजता फुगेवाडी स्थानकावर पोहोचली. आजच्या चाचणीसाठी डी.डी. मिश्रा, कार्यकारी संचालक रवी कुमार, मुख्य प्रकल्प अभियंता संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले. चेतन फडके या ट्रेन ऑपरेटरने ही ट्रेन चालविली.

चाचणीसाठी ३ कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली

या चाचणीसाठी ओएचई (OHE) तारा २५ के.व्ही विद्युत भाराने सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत प्रभावित केल्या होत्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती, तसेच ६ किमी रेल्वे रूळच्या (ट्रॅक) सुरक्षेच्या दृष्टीने निरीक्षण, अशा अनेक बाबींची पूर्तता करून आजची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. पुणे मेट्रोचे काम पूर्ण वेळेत करण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. या चाचणीसाठी ३ कोच लांबीची मेट्रो ट्रेन वापरण्यात आली. महामेट्रोचे तांत्रिक कुशल कामगार या चाचणीसाठी अनेक दिवसांपासून झटत होते. आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे.

पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डायजेशन (RDSO), कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असून चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. आज घेण्यात आलेली चाचणी ही पुणे मेट्रोच्या कामा मधला एक महत्वाचा टप्पा असून या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी, आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. सर्व पुणेकरांचा पुणे मेट्रोच्या कामात प्रचंड सहयोग असल्यामुळेच महामेट्रो हे काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकली, असे सांगितले.

हेही वाचा - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी केले सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.