पालघर - डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर वैतरणा येथे अज्ञाताने दगड फेकेल्याने रुतिक दिनेश शिरोडकर (वय 17) हा विद्यार्थी जखमी झाला आहे. यामध्ये रुतीकच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताला पाच टाके पडले आहेत.
पालघर मधील सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा रुतीक शनिवारी 10.40 च्या लोकलने काही कामानिमित्त मित्रांसोबत मुंबईकडे निघाला होता. मात्र, वैतरणा पूलाजवळ लोकल आली असता अज्ञाताने फेकलेला दगड रुतीकच्या डाव्या हाताला लागला. यात रुतीकच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तातडीने विजय वल्लभ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.