ETV Bharat / state

Strict Security In Pune : पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक बंदोबस्त - नरेंद्र मोदी

सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक बंदोबस्त आहे. पोलिस विशेष तपास मोहिम राबवत आहेत. या अंतर्गत अनेक गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. यात हजारो गुन्हागार गुंडांची झाडाझडती करण्यात आली तर 602 सऱ्हाईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

Strict security in Pune
पुण्यात कडक बंदोबस्त
author img

By

Published : Jul 27, 2023, 3:18 PM IST

पुणे : विविध कामाचा उद्घाटन सोहळा आणि लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्यात येत आहेत. त्या निमित्ताने पुणे पोलिसांकडून बंदोबस्तात चांगलीच वाढ करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम राबवण्यात येत आहे, त्याच अनेक गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे.

पुणे शहरातील गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दोन दिवसांपासून रात्री विशेष मोहीम राबवत आहेत. मध्यरात्री पोलिसांनी शहरातील, हजारो गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यापैकी 602 सराईत गुंड गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. रात्री विविध पोलीस स्टेशन ठाण्यातील गुन्हे शाखेच्या वतीने विशेष मोहिमेतील ही कारवाई करण्यात येत आहे. व्हि व्हिआयपींच्या दौऱ्याच्यावेळी अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात.

वेगवेगळ्या गुन्ह्यात रेकॉर्ड वर असलेल्यां पैकी बेकायदा शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे. जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत २८ जणांना पकडले आहे. यात शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानक, हॉटेल्स, लॉजची तपासणी करण्यात येत आहे. त्यासोबतच नाकाबंदी करण्यात येत आहे. यात संशयित वाहन चालकाची चौकशी करण्यात येत आहे. नाकाबंदीत आत्ता पर्यंत 934 वाहन चालकाची तपासणी करण्यात आली आहे.

नाकाबंदित 213 वाहन चालकविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून. त्यांच्याकडून 1 लाख 46 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमी शहरातील बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन होत आहे. त्यांना जाहिर झालेला लोकमान्य टिळक पुरस्कार ही ते याच दिवशी स्विकारणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही मोहीम राबवण्यात येत असून सुरक्षितेमध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी पुणे पोलिस सतर्क झाले असून कडक बंदोबस्त सोबतच खबरदारीच्या सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत.

हेही वाचा

Pune Terrorist : पुण्यात दहशतवाद्यांनी रचला होता बॉम्बस्फोटाचा कट; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.