पुणे - जिल्ह्यात आज चक्रीवादळाने थैमान घातले. ग्रामीण भागात आज आलेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र यांना बसला आहे. अनेक ठिकाणी शाळा अंगणवाडी, आरोग्य केंद्र तसेच सार्वजनिक शेड यांचे छत उडाले आहे. त्यामुळे शाळकरी मुलांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे
खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात आज दुपारपासूनच पावसासह चक्रीवादळाला सुरुवात झाली होती. यामध्ये खेड तालुक्यातील पराळे येथील अंगणवाडी, धामणे येथील शाळा, खरोशी येथील शाळा, ढगाळवाडी येथील अंगणवाडी, टोकावडे येथे आरोग्य उपकेंद्र यांच्या इमारतीवरील छत उडाले आहे. तर आंबेगाव तालुक्यात डिंबा येथील शाळेचे शेड उडाले आहे. त्यामुळे शाळेतील शालेय उपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसला आहे.
खेड, आंबेगाव आणि जुन्नर परिसरातील पश्चिमेच्या डोंगराळ भागात चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव होता. त्यामुळे महसुल विभाग, पोलीस, पंचायत समिती आधिकारी याच भागात पाहणी करत आहेत तर आदिवासी भागात अनेक गावांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
पुण्याच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळाचा तडाखा, शाळा-अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांचे पत्रे उडाले - school roof news
खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात आज दुपारपासूनच पावसासह चक्रीवादळाला सुरुवात झाली होती. यामध्ये खेड तालुक्यातील पराळे येथील अंगणवाडी, धामणे येथील शाळा, खरोशी येथील शाळा, ढगाळवाडी येथील अंगणवाडी, टोकावडे येथे आरोग्य उपकेंद्र यांच्या इमारतीवरील छत उडाले आहे.