पुणे: पुण्यात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात प्रामुख्याने घरच्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे या पुण्यामध्ये दिसून येत आहे. असाच एक प्रकार आता पुण्यात वानवाडी भागामध्ये घडलेला असून सावत्र बापाने आपल्या पंधरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार (stepfather raped minor girl ) केला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला (rape case filed against stepfather) असून पोलिसांनी एकाला अटक (stepfather arrested in Rap case) केली आहे. Latest news from Pune, Pune Crime. पीडित मुलगी गर्भवती Girl pregnant असल्याचे पोलीसांनी सांगितले. minor girl rape Pune
सावत्र बापापासून मुलगी गर्भवती- सावत्र बापाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. नराधम पित्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली.
पीडितेच्या आईची नवऱ्याविरुद्ध तक्रार - याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला 35 वर्षे वयाची आहे तर आरोपी 25 वर्षे वयाचा आहे. फिर्यादी महिलेने आरोपी सोबत दुसरे लग्न केले होते. फिर्यादी यांच्या पहिल्या पतीपासून झालेल्या पंधरा वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ,आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वारंवार केलेल्या या लैंगिक अत्याचारामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
आरोपीला अटक- पीडित मुलीच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.