पुणे State Health Department Issues Guidelines : कोरोनानंतर आता पुन्हा एकदा चीनमध्ये न्यूमोनियाचा (pneumonia) उद्रेक पाहायला मिळत आहे. याचीच दक्षता घेत राज्याच्या आरोग्य विभगानं परिपत्रक जाहीर केलं असून यात रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. शासनानं काढलेल्या निर्देशमध्ये अलीकडील आठवड्यामध्ये चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाच्या (न्यूमोनिया) आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचं कारण प्रामुख्याने इन्फ्ल्यूएंजा, मायोप्लाज्ञा आणि सार्स कोविड १९ हे आहेत. तरी सद्यपरिस्थितीमध्ये चीनमधील या उद्रेकाचं राज्य आणि देशासाठी धोक्याचं कारण नाही. तरीही या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पूर्वतयारी आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळांची तयारी करण्याची आवश्यकता आहे. या अनुशंगानं सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांना दिलेले निर्देश -
01) आय.एल.आय/ सर्वेक्षण - सर्व जिल्ह्यांनी आणि महानगरपालिकेने आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व आरोग्यसंस्थाना ILI/SARI सर्वेक्षण बळकटीकरण करुन सर्व ILI/SARI रुग्णांची आय एच.आय.पी. पोर्टलवरती नोंद करण्यात यावी. तसंच सर्व जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील असलेल्या आरोग्यसंस्था विशेषतः वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालयांनी ILI/SARI सर्वेक्षणावरती विशेष लक्ष देण्यात यावे.
02 रुग्णालयीन तयारी - सर्व जिल्ह्यातील कोविड रुग्णालयामध्ये खाटांची तयारी, ऑक्सीजन उपलब्धता, व्हेंटीलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी, ऑक्सीजन प्लॉन्ट आणि ऑक्सीजन सिलेंडर कार्यान्वित आहेत की, नाही याची खातरजमा करावी.
3) प्रयोगशाळा सर्वेक्षण - आपल्या आरोग्य संस्थामधील ILI/SARI रुग्णांचे नमुने RTPCR प्रयोगशाळांना पाठविण्यात यावेत. तसेच ILI/SARI रुग्णाचे काही नमुने जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठविण्यात यावेत.
4) रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधक पद्धती - रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रण पद्धती जसे, वारंवार हात धुणे, मास्क घालणे, पीपीई कीटचा वापर करणे. इ. गोष्टीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व रुग्णालयामध्ये या गोष्टींचा अवलंब होईल याची खातरजमा करावी.
५) औषधसाठा आणि इतर साधनसामग्री उपलब्धता - सर्व आरोग्य संस्थामध्ये ILI/SARI आणि इतर श्वसनसंस्थेच्या आजारांसाठी लागणारी औषधे, उपलब्ध आहेत का याची खातरजमा करावी. तसेच ऑक्सीजन सिलेंडर, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याची खात्री करावी.
06 ) आय.एच.आय.पी. पोर्टलवरील माहितीचे संनियंत्रण - सर्व जिल्ह्यांनी आय.एच.आय.पी. पोर्टलवरील ILI/SARI नोंद केलेल्या रुग्णांच्या भागामध्ये क्लस्टरींग ऑफ केसेस आहे की, नाही याची खातरजमा करावी. तसेच आय.एच.आय.पी. पोर्टलवरील ILI/SARI इव्हेंट अलर्ट नोंदविला असल्यास जिल्हा शीघ्र तपासणी पथकाने त्याचे अन्वेषण करावे.
07) आरोग्य शिक्षण - सर्व जिल्ह्यांमध्ये कोविडबाबत आरोग्य शिक्षण करण्यात यावे. विशेषतः श्वसनसंसर्ग असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेण्याबाबत भर दावा. तथापी जनतेमध्ये विनाकारण भीती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
हेही वाचा -