पुणे - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चळवळीतून आलेले अतिशय चांगले कार्यकर्ते आहे. पण, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकट्या माणसाला सगळ्या गोष्टींचा आवाका आणि निर्णय घेणे शक्य नसल्याने सल्लागार ठेवावे लागतात. ते सल्लागार त्यांना योग्य सल्ला देत असतात. मुख्यमंत्री या सल्लागाराच्या मदतीने असे निर्णय घेत आहेत की, धड कोरोनावर नियंत्रण निर्माण होण्यासाठी फायदा होत आहे, ना धड सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेत काहीही फायदा होत आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
शनिवार, रविवार पूर्ण टाळेबंदी आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामकाजाला परवानगी दिली आहे. मात्र, यावेळेस कामकाजाला बाहेत जाण्यासाठी सार्वजनिक बससेवा बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने ती चालू करावी. सरकारच्या प्रत्येक निर्णयात काहीतरी गोंधळ दिसत आहे. सोमवार ते शुक्रवार संचारबंदी आणि दोन दिवस टाळेबंदी यात सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे काय? यावर सरकार काही बोलत नाही आणि सल्लागारही काही सल्ला देत नाहीत, अशी टिकाही यावेळी पाटील यांनी केली.
सरकारला आमदारांचा विचार, मात्र सर्वसामान्य नागरिकांचा नाही
एकीकडे सरकार सांगत आहे की, महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीयेत. मात्र, दुसरीकडे आमदारांचा निधी दोन कोटीवरून चार कोटी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकूण साडेतीनशेहून अधिक आमदार आहेत, हे सर्व मिळून सातशे कोटी रुपये सरकार या आमदारांना देत आहे. या सातशे कोटीचे सर्वसामान्य जनतेला आर्थिक मदत करायला हवी. सरकार आमदारांच्या विचार करत आहे, मात्र सर्वसामान्यांचा विचार करत नाही, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली. अजित पवार प्रत्येक बैठकीत त्यांचेच म्हणणे रेटून नेहेता, अशी टीका त्यांनी केली. बैठकीत कोणाचेही काहीही असो त्यांचे म्हणणे काहीही असो, अजित पवार स्वत:चेच खरे म्हणातात, असेही ते म्हणाले.