ETV Bharat / state

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिला राजीनामा

Laxman Hake Resign : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यात वाद सुरू आहे. या वादामुळं राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Resignation of Laxman Hake
लक्ष्मण हाके यांचा राजीनामा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 5:39 PM IST

पुणे Laxman Hake Resign : राज्यात मराठा आंदोलन (Maratha Reservation) आणि ओबीसी आंदोलन आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळं सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला या मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात एक बैठक सुद्धा झाली. पण अंतर्गत मतभेद आणि निकष यामुळं या मागासवर्ग आयोगाचे एक एक पदाधिकारी आता राजीनामा देत आहेत. आज राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राजीनामा दिलेला आहे.

laxman Hake Resign
लक्ष्मण हाके यांचा राजीनामा

राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरूच : चार दिवसात दुसरा राजीनामा देण्यात आला आहे. आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महिनाभरात आयोगातील चार जणांनी राजीनामा दिला आहे. बबनराव तायवाडे, संजय सोनवणे, बी एल किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनीही राजीनामा दिलाय.

आयोगाच्या बैठकीमधील माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे मी हा राजीनामा देत आहे. राज्य सरकारचा आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे निर्माण झालेला मागासवर्ग आयोगावर दबाव आणि वैचारिक मतभेदामुळं मी हा राजीनामा देत आहे - लक्ष्मण हाके

सरकारच्या भूमिकेमुळे मागासवर्ग आयोगात मतभेद : यापूर्वीच बबनराव तायवाडे संजय सोनवणे, बी एल किल्लारीकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर बी एल किल्लारीकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटसुद्धा घेतली होती आणि आपली भूमिका मांडली होती. आरक्षणाच्या सरकारच्या भूमिकेमुळे मागासवर्ग आयोगात सुद्धा मतभेद निर्माण होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. तर नेमकं मराठा आरक्षण आता मिळणार कसं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर इतर प्रश्न सुद्धा मागासवर्ग आयोग कशा पद्धतीने हाताळणार हे पहावं लागणार आहे.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर? मनोज जरांगेंच्या दाव्यानं खळबळ
  2. तुषार दोशींच्या नियुक्तीवरुन सरकारमध्ये जुंपली; मतभेद पुन्हा चव्हाट्यावर
  3. मराठा आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सक्तीच्या रजेवरील तुषार दोषींची पुण्यात बदली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.