ETV Bharat / state

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील साकुर्डी गावाला लाल परीची फेरी सुरू - pune

ग्रामिण भागात दळणवळणासाठी एसटी बस हे एकमेव साधन आहे. आजपर्यत साकुर्डी आणि चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील गावांना दळणवळणासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील साकुर्डी गावाला लाल परीची फेरी सुरु
author img

By

Published : Jun 30, 2019, 11:02 AM IST

पुणे - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या साकुर्डी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राची लाल परी एसटी बससेवा सुरू झाली आहे. राजगुरूनगर बसस्थानकातून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करून या बसची सुरुवात करण्यात आली.

ग्रामिण भागात दळणवळणासाठी एसटी बस हे एकमेव साधन आहे. आजपर्यत साकुर्डी आणि चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील गावांना दळणवळणासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यातुन शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांनाही अडथळे येत होते. मात्र, आता एसटी बस राजगुरुनगर ते साकुर्डी वडगाव पाटोळे-दोंदे-सायगाव-वेताळे मार्गे साकुर्डीला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम भागातील नागरिक, तसेच शाळकरी मुलांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले

ST Bus facility started in sakurdi pune
साकुर्डी गावाला लाल परीची फेरी सुरु

गावात पहिल्यांदा एसटी बस आल्याने गावकऱ्यांसह नागरिकांनी शाळकरी मुलांनी एसटी बसची पुजा करत स्वागत केले. ही बस सेवा कायमस्वरुपी सुरू रहावी, अशी मागणीदेखील गावकऱ्यांनी केली आहे.

Intro:Anc__स्वातंत्र्यानंतर पहिल्यांच खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणा-या साकुर्डी गावाला महाराष्ट्राची लाल परी एसटी बस सुरु झाली असुन आज सकाळी राजगुरुनगर बसस्थानकातुन जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचे हस्ते या शुभारंभ करुन या एसटी बसची सुरुवात झाली आहे

ग्रामिण भागात दळणवळणासाठी एस टी बस हे एकमेव साधन असुन आज पर्यत साकुर्डी व चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील गावांना दळणवळणासाठी मोठा संकर्ष करावा लागत होता त्यातुन शाळकरी व महाविद्यालयीन मुलांनाही समोरही मोठं संकट उभं होतं आज पासुन सुरु झालेली एसटी बस राजगुरुनगर ते साकुर्डी वडगाव पाटोळे -दोंदे -सायगाव - वेताळे मार्गे साकुर्डीला जाणार आहे.दररोज सकाळी 9 वाजता एसटी राजगुरुनगर एस टी स्टॅन्ड वरून सुटणार आहे त्यामुळे पश्चिम भागातील नागरिक शाळकरी मुलांना या बसचा मोठा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान गावात पहिल्यांदा एसटी बस गावात आल्याने गावक-यांसह नागरिकांनी शाळकरी मुलांनी एसटी बसची पुजा करत स्वागत केली आणि हि बस सेवा कायमस्वरुपी सुरु रहावी हि मागणी केली आहे.

Body:..Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.