ETV Bharat / state

रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - शरद पवारांचे संभाव्य राजकीय वारस

अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पवार कुटुंबातील दुसऱ्या पीढीने राजकारणात आपली नेतृत्व क्षमता सिध्द केली आहे. त्यानंतर हा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार याबाबत प्रामुख्याने पार्थ आणि रोहित पवार यांच्या नावाची चर्चा होते. कमी कालावधीत आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक दाखवलेल्या रोहित यांचा आज वाढदिवस आहे.

रोहित पवार
author img

By

Published : Sep 29, 2019, 9:02 PM IST

Updated : Sep 30, 2019, 11:56 AM IST

मुंबई - शरद पवार महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातले वलयांकीत नाव आहे. 52 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची तिसरी पिढीही आता राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. रोहित पवार तिसऱ्या पीढीतील चर्चीत नाव आहे. कमी कालावधीत आपल्या राजकीय परिपक्वतेची चुणूक रोहित यांनी दाखवून दिली आहे.

पवारांचे संभाव्य राजकीय वारस:

अजित पवार आणि सुप्रिया सुळे या पवार कुटुंबातील दुसऱ्या पीढीने राजकारणात आपली नेतृत्व क्षमता सिध्द केली आहे. त्यानंतर हा राजकीय वारसा पुढे कोण सांभाळणार याबाबत प्रामुख्याने पार्थ आणि रोहीत पवार यांच्या नावाची चर्चा होते.

रोहित पवारांबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

रोहित हे अजित पवार यांचे चुलत भाऊ राजेद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी शरद पवारांचे नातू या पुरतीच आपली ओळख मर्यादित ठेवली नाही. एक उद्योजक, शेतीची उत्तम जाण असणारा लोकप्रतिनीधी म्हणून रोहित यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. वयाच्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. 'इंडियन शुगर मिल्स असोसिएशन'चे अध्यक्ष आहेत. असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष असण्याचा मानही रोहित यांना मिळाला आहे.

शिक्षण :
रोहित यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 12 वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून 2007 मध्ये व्यवस्थापन शास्त्र विषयात पदवी संपादन केली.

कुटुंब:

पुण्यातील मगरपट्टासीटीचे प्रमुख सतीश मगर यांची कन्या कुंती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आनंदिता आणि शिवांश या दोन मुलांचे ते वडिल आहेत.

राजकीय पदार्पण:

रोहित यांच्या राजकारणातील प्रवेशाची गोष्टही तितकीच रंजक आहे. पार्थप्रमाणे त्यांनाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक थेट लढवता आली असती. मात्र, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेवरील आपला विश्वास दाखवत पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून मैदानात उडी घेतली. 'डाऊन टु अर्थ' असणाऱ्या रोहीत यांनी शिरसुफळ गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यात ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाले होते.

‘सृजन’मार्ग:

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित यांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ‘सृजन’ उपक्रम त्याचाच एक भाग. ‘सृजन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना व्यासपीठ मिळवून दिले.

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.