ETV Bharat / state

लोकवस्तीत येऊन बिबट्या लढतोय जीवन-मरणाची लढाई

शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई सुरू आहे.

लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई
author img

By

Published : Apr 3, 2019, 6:22 PM IST

Updated : Apr 4, 2019, 4:09 AM IST

पुणे - घनदाट जंगलामध्ये मुक्तपणे संचार करणारा बिबट्या आज लोकवस्तीत येऊन स्वतःच्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे. शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबट्या ऊस शेतीलाच जंगल समजून वास्तव्य करू लागला. तिथूनच सुरू झाली बिबट्याच्या या जीवन-मरणाची लढाई. कधी शिकारीच्या शोधात तर कधी अपघातात बिबट्या व बछड्यांचा मृत्यू होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई

सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या घनदाट जंगलात काही काळ वास्तव्य करुन जंगलाचा राजा असणाऱ्या बिबट्याच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी शिकारीच्या शोधात बिबट्याने लोकवस्तीचा सहारा घेतला. पाळीव प्राण्यांवर शिकारीच्या हेतूने हल्ले वाढले. त्यातच बिबट्या माणसांवरही हल्ले करु लागला आणि सुरु झाला तो मोठा संघर्ष.

उसाच्या शेतीला जंगल समजून वास्तव्य करत असताना ऊसतोडणी सुरु झाली आणि बिबट्याचे वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यात चिमुकले बछडेही होरपळू लागले. तसेच शिकारी शोधात असताना खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे अपघात, विहिरीत पडून मृत्यू तर कधी घातपात अशा घटना आजही वाढत चालल्या आहेत.

तर दुसरीकडे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राच्या मदतीने ५४ बछड्यांना आईच्या कुशीत सोडण्याचे काम केले. हे बिबट निवारा केंद्र बिबट्यांच्या संगोपनासाठी दिवसरात्र काम करत आहे. तरी बिबट्यांचे मृत्यू वाढतच आहे.

जंगलवस्तीचा राजा लोकवस्तीत येऊन स्वतःचे व बछड्यांचे संगोपन कसे करणार, असा प्रश्न समोर आहे. असे असताना वनविभागाकडून तातडीच्या मदतीच्या उपाययोजना होत नाही. त्यामुळे सध्या बिबट्या संकटात सापडत चालला आहे.

Intro:Anc__ घनदाट जंगलामध्ये मुक्तपणे संचार करणारा हा बिबट्या आज लोकवस्ती येऊन स्वतःच्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे , शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबट्या ऊस शेतीला जंगल समजून वास्तव्य करू लागला तिथूनच सुरू झाली बिबट्याच्या जीवन-मरणाची लढाई. कधी शिकारीच्या शोधात तर कधी अपघातात तर कधी शिकारीच्या मागे फिरताना बिबट व बछड्यांचा मृत्यू होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे

सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या घनदाट जंगलात काही काळ वास्तव्य करुन जंगलाचा राजा असणाऱ्या बिबट्याच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे गेल्या अनेक दिवसांपासुन आपल्या पोटाचं खळगं भरण्यासाठी शिकारीच्या शोधात बिबट्याने लोकवस्तीचा सहारा घेतला पाळीव प्राण्यांवर शिकारीच्या हेतुने हल्ले वाढले त्यातच बिबट माणसांवरही हल्ले करु लागला अन सुरु झाला तो मोठा संघर्ष...

खरं बिबट हा घाबरट प्राणी म्हणुन एक वेगळी ओळख आहे त्यातच शिकारी शोधात असताना खेड आंबेगाव जुन्नर,शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे अपघात,विहिरीत पडुन मृत्यु,तर कधी घातपात अशा घटना आजही वाढत चालल्या आहे

उसाच्या शेतीला जंगल समजुन वास्तव्य करत असताना ऊसतोडणी सुरु झाली अन बिबट्याचे वास्तव्य धोक्यात आले त्यात चिमुकले बछडेही होरपळु लागले त्यात विचित्र घटना घडुन बछड्यांचा मृत्यु होऊ लागला तर दुसरीकडे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राच्या मदतीने ५४ बछड्यांना आईच्या कुशीत सोडण्याचे काम केले व हे बिबट निवारा केंद्र बिबट्या संगोपनासाठी दिवसरात्र काम करत आहे तरी बिबट्यांचे मृत्यु वाढतच आहे

जंगलवस्तीचा राजा लोकवस्तीत येऊन स्वतचे व बछड्यांचे संगोपन कसे करणार असा प्रश्न समोर असताना वनविभागाकडुन तातडीच्या मदतीच्या उपाययोजना होत नाही.त्यामुळे सध्या बिबट संकटात सापडत चालला आहे.Body:...Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 4:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.