पुणे - जंगलात वास्तव्य करणारा बिबट्या ऊसशेतीत वास्तव्य करू लागला आणि त्यातून बिबट्या हा पाळीव प्राण्यांसह माणसांवर देखील हल्ला करू लागला. वन्यजीव प्राणी आणि मानवातील संघर्ष सुरू झाला. या संघर्षाला थांबवण्यासाठी वन विभागातील महिला वनरक्षकांनी कर्तव्यावर दाखल होत जबाबदारी स्वीकारली. याच वनपाल महिलांच्या सिरिजमधील 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट...
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी 'ती' कर्तव्यावर तत्पर जुन्नर वन परिक्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील परिसरात मुबलक पाणी व वास्तव्यासाठी ऊसशेती असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यात वाढलेले शहरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यामुळे लोकवस्ती वाढली आहे. याचा थेट परिणाम मानव आणि वन्यजीव संघर्षात होत आहे. जंगलक्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीत शिरतात. या ठिकाणी गुरं, छोटी जनावरं असल्याने बिबट्यांना देखील भक्ष्य उपलब्ध होते. हा संघर्ष थांबवण्यासाठी महिला वनरक्षक म्हणून अडचणी येत असल्या तरीही महिला अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी मोठ्या हिंमतीने पेलली आहे. महिला म्हणून कर्तव्य बजावत असताना जंगल परिसरात मोठी आव्हाने समोर असतात. मात्र, आपले कर्तव्य डोळ्यासमोर ठेऊन बिबट्यांच्या क्षेत्रात दिवस-रात्र काम करावे लागते, असे वनरक्षक शितल शिंदे म्हणाल्या. मानव आणि बिबट्या संघर्षावर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा मुख्य भाग आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी बिबट्यांच्या संरक्षणासाठी प्रात्यक्षिके करावी लागतात. ही सर्व कामे महिला म्हणून आव्हानात्मक असतात.
वनपाल महिलांच्या सिरिजमधील 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट... बिबट्यांचे वास्तव्य, अपघात, शिकार ठिकाण या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यामुळे बिबट्याविषयी व वनविभागावर नागरिकांचा मोठा संताप असतो. यावेळी बिबट्याचे व मानवासह पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी वनविभागावर असते. अशावेळी महिला म्हणून काम करत असताना अनेक अडचणी समोर येतात. मात्र, कर्तव्य केंद्रस्थानी ठेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानुसार प्रत्येकजण काम करत असल्याचे वनरक्षक शितल शिंदे यांनी सांगितले.
मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी वन विभागातील महिला वनरक्षकांनी कर्तव्यावर दाखल होत जबाबदारी स्वीकारली. बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष सुरू असताना बिबट्याचे रेस्क्यू करणे हे मोठे आव्हान असते. यामध्ये बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशनमधून कोणतीही कोणतीही इजा न होता काम करावे लागते. त्यावेळी स्थानिक नागरिकांची मोलाची मदत मिळते. वनविभागाने नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे बिबट्या विषयी आदर व आपुलकी निर्माण होत आहे. त्याचा फायदा बिबट्याच्या संकटावेळी होत असून बिबट्यावर येणारे संकट स्थानिक नागरिकांच्या मदतीने अगदी सहजपणे रेस्क्यू करता येते.कर्तव्य व कुटुंबाची जबाबदारी या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळाव्या लागतात. कर्तव्य बजावत असताना दिवस-रात्र काम करावे लागते. अशावेळी मोठे आव्हान असते. मात्र, या परिस्थितीत प्रथम आपले कर्तव्य पार पाडावे लागते. त्यामध्ये कुटुंबाला बाजूला ठेवण्याची तयारी असल्याचे वनरक्षक शितल शिंदे यांनी सांगितले.