ETV Bharat / state

सुपे बाजारात यंदा चिंचेच्या हंगामात होतेय विक्रमी वाढ, चालू वर्षी एक कोटीची झाली उलाढाल - पुणे जिल्हा बातमी

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे येथील उपबाजारात चिंचेचा सर्वात मोठा बाजार भरतो. पुणे जिल्ह्यातील चिंचेची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सुपे बाजाराकडे पाहिले जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचेचा हंगाम पूर्ण वाया गेला होता. मात्र, चालू हंगामात चिंचेची मोठी आवक होत आहे. आजच्या बाजारात तब्बल 10 हजारांहून अधिक पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे

photo
छायाचित्र
author img

By

Published : Mar 16, 2021, 8:30 PM IST

Updated : Mar 16, 2021, 10:13 PM IST

बारामती (पुणे) - बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे येथील उपबाजारात चिंचेचा सर्वात मोठा बाजार भरतो. पुणे जिल्ह्यातील चिंचेची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सुपे बाजाराकडे पाहिले जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचेचा हंगाम पूर्ण वाया गेला होता. मात्र, चालू हंगामात चिंचेची मोठी आवक होत आहे. आजच्या बाजारात तब्बल 10 हजारांहून अधिक पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे. सध्या अखंड चिंचेचा दर 2 हजार ते 4 हजार रुपये तर फोडलेल्या चिंचेचा दर 6 हजार 800 ते 9 हजार 190 रुपये, चिंचोकाचा दर 1 हजार 530 तर 1 हजार 600 इतका आहे.

सुपे बाजारात यंदा चिंचेच्या हंगामात होतेय विक्रमी वाढ, चालू वर्षी एक कोटीची झाली उलाढाल

मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीमुळे गतवर्षीचा चिंचेचा हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या नैराश्य होते. मात्र, चिंचेला चांगला दर असून आवकही वाढत आहे. चिंचेचा हा चालू हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली..

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील व्यापाऱ्यांकडून होतेय खरेदी

येथील बाजारात बारामतीसह इंदापूर, शिरूर, पुरंदर, हवेली, दौंड, भोर, मावळ, सोलापूर, फलटण, लोणंद, सातारा आदी भागातील शेतकरी चिंच विक्रीसाठी आणतात. तर लातूर, तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बार्शीसह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदीसाठी येतात. गतवर्षी टाळेबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने तसेच वेळोवेळी बाजार बंद राहिल्याने खरेदी-विक्री तेवढ्या प्रमाणात होऊ शकली नाही. शिवाय बाजारपेठ व मालाला उठाव नसल्याने चिंचेचा भाव पन्नास टक्क्यांनी घटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह बाजार समितीला ही मोठा आर्थिक फटका बसला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत वाढती उलाढाल

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील सुपे बाजारात सन 2019 ला चिंचेच्या खरेदी विक्रीतून तब्बल सहा कोटींची उलाढाल झाली होती. मात्र, गत वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच अवकाळी पावसामुळे चिंचेची आवक घटल्याने 2019 च्या तुलनेत 3.75 कोटी रुपयांची तफावत होती. यंदा बाजार सुरू असल्याने व आवक वाढत असल्याने मे अखेर सुरू राहणाऱ्या या बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. बाजार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 24 हजार 209 पोत्यांची आवक झाली असून सुमारे 3 कोटींची उलाढाल आतापर्यंत झाली आहे.

आंध्रप्रदेश तेलंगणामधून चिंचेला अधिक मागणी

चालू हंगामात आंध्रप्रदेश व तेलंगणातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात चिंच खरेदी केली जात आहे. आजच्या बाजारात आवक झालेल्या 24 हजार पोत्यांपैकी 18 हजार पोती एकट्या आंध्रप्रदेशातील व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. या खरेदी-विक्रीत सुमारे 1 कोटींची उलाढाल झाली आहे.

व्यापारी व शेतकरी समाधानी

चालू हंगामात अखंड व फोडलेल्या चिंचेला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तर आवक वाढत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकरीही मोठ्या प्रमाणात बाजारात चिंच आणत असून व्यापारीही मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.

बाजार मे अखेरपर्यंत सुरू राहणार

मागील 44 वर्षांपासून सुपे येथे चिंचेचा बाजार भरतो. गतवर्षी कोरोनामुळे बाजार सुरळीत चालू नव्हता त्यामुळे केवळ 25 हजार पोत्यांची आवक झाली होती. मात्र, 16 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या बाजारात आतापर्यंत 24 हजार पोत्यांची आवक झाली आहे. बाजार मे अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याने आणखी आवक वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील व्यापारी मोठ्या प्रमाणात चिंच खरेदी करत आहे. परिणामी चिंचेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

हेही वाचा - बारामतीतील 'तो' चोरीचा प्रकार बनाव

हेही वाचा - पुण्याच्या उपमहापौरांचा राजीनामा; पुढचा उपमहापौर आरपीआयचा

Last Updated : Mar 16, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.