पुणे - बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय 50) यांचा खून झाल्याची घटना घडली. युवराज थोरात यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. बुधवारी (15 जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरालगत हा खून झाला. एका युवकाने थोरात यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संक्रातीनिमित्त पंचक्रोशीतील महिला सोनेश्वर मंदिरात ओवाळण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी मंदिर परिसरात संशयित तरुण महिलांची छेड काढत होता. सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज यांनी त्याला याबाबत जाब विचारला. त्यामुळे तरूणाने चिडून थोरांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात थोरात यांचा जागी मृत्यू झाला.
हेही वाचा - दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला 'आजन्म कारावास'
या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले. या प्रकरणाबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.