ETV Bharat / state

Pune Crime : धक्कादायक! मोबाईल पाहताना रागावल्याच्या कारणातून मुलाने केली आईची हत्या

author img

By

Published : Feb 17, 2023, 3:46 PM IST

मोबाईल पाहाताना रागावल्याच्या कारणातून मुलाने आईची हत्या केली आहे. ही घटना पुण्यातील उरळी कांचन येथे घडली आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

Son Killed Mother
मुलाने केली आईची हत्या

पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. नवतंत्रज्ञानाच्या युगामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील उरळी कांचन येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरळी कांचन येथे अभ्यास करताना मोबाईल पाहात असलेल्या मुलाला रागविल्याच्या कारणातून १२ वीत शिकणार्‍या मुलाने आईला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर तीची हत्या केली आहे.

आरोपी मुलगा ताब्यात: संबंधित घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यातील उरुळी कांचन येथे ही घटना घडली आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मृत महिलेचे नाव आहे.

अशी आली घटना समोर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीम शेख हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. त्यात गळा दाबल्यामुळे डोक्याला जखम झाली असा अहवाल मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. हा अहवाल दिल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि या तपासात त्यांना काही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुलाने केली आईची हत्या: तेव्हा नेमकी कोणी माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला़. ही घटना घडली, तेव्हा वडील जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. पोलिसांनी मुलगा आणि मृत महिलेच्या पतीकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली. जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईल पाहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली व ती त्याच्यावर रागविली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे मुलाने आपल्या आईची हत्या केली. यादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.

डॉक्टारांना आला संशय: धक्कादायक बाब म्हणजे मुलगा जिशान आई पडल्याचे पाहून तो घाबरला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर मुलाने सांगितले की, आईने आत्महत्या केली आणि मी तिला खाली उतरुन ठेवले. त्यांनी तस्लीम यांना जवळच्या रुग्णालयात नेले.

हेही वाचा : Aurangabad Crime News: पोलीस रक्षक की भक्षक? पोलीस उपनिरीक्षकाचे महिलांशी गैरवर्तन; मद्यधुंद अवस्थेत कारनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.