ETV Bharat / state

धक्कादायक! दारू पिऊन आल्याने घरात घेण्यास नकार, जावयाने सासूच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड - दारू

औंध येथील संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातील वाघमारे वस्तीत जावयाने सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन खून केला.

चतुःश्रृंगी पोलीस ठाणे
author img

By

Published : May 9, 2019, 1:57 PM IST

पुणे - दारू पिल्यानंतर घरात न घेतल्याने जावयाने सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत खून केला. पाषाण येथील संजय गांधी वसाहतीत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सुदामती देवराम गायकवाड (६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिगंबर ओव्हाळ (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी जावयाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चतुःश्रृंगी पोलीस ठाणे

औंध येथील संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातील वाघमारे वस्ती येथे सुदामती गायकवाड आणि आरोपी दिगंबर ओव्हाळ राहत होता. दिगंबर हा मजुरीचे काम करतो. त्याचे यापूर्वीही एक लग्न झाले असून त्याने सुदामती यांच्या मुलीसोबत दुसरे लग्न केले होते. सुदामती या वारकरी होत्या. तर दिगंबर याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो जेव्हा दारू पिऊन यायचा तेव्हा त्या त्याला घरात येऊ देत नव्हत्या. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडणही झाले होते. आज दुपारीही त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने सासूला बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी दिगंबर याला ताब्यात घेतले आहे. तसेच सुदामती यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.

Intro:
(police station visual FTP)
दारू पिल्यानंतर घरात येऊ न देणाऱ्या सासूचा जावयाने डोक्यात लोखंडी वार करीत खून केला. पाषाण येथील संजय गांधी वसाहतीत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चतुःशृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जावयाला अटक केली आहे. सुदामती देवराम गायकवाड (६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी दिगंबर ओव्हाळ (वय ४५ ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातील वाघमारे वस्ती येथे सुदामती गायकवाड आणि आरोपी दिगंबर ओव्हाळ राहात होता. दिगंबर ओव्हाळ हा मजूरीचे काम करतो. त्याचे यापुर्वी एक लग्न झालेले आहे. तर सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याने दुसरे लग्न केलेले आहे. सुदामती गायकवाड या वारकरी होत्या. तर दिगंबर याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो जेव्हा दारू पिउन यायचा तेव्हा सुदामती त्याला घरात येऊ देत नव्हत्या. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडणही झाले होते. आज दुपारीही त्यांच्यात जुन्या कारणावरून वाद झाले. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने सासू सुदामती गायकवाड यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Conclusion:दरम्यान घटनेची माहिती मिळताच चतुश्रृंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी दिगंबर याला ताब्यात घेतले असून सुदामती यांचा मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.