पुणे - दहशत पसरवण्याच्या हेतूने एका टोळक्याने पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. रविवारी (7 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात टोळक्याचा राडा, बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड - पुणे क्राईम न्यूज
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बकुळानगर परिसरातील रस्त्यांवर ही वाहने पार्क केली होती. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका टोळक्याने लाकडी दांडक्याने या वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन दुचाकी, ऑटोरिक्षा आणि ओम्नी व्हॅनचे नुकसान झाले आहे.
![पुण्यात टोळक्याचा राडा, बिबवेवाडीत वाहनांची तोडफोड bibwewadi pune news pune latest news pune crime news पुणे लेटेस्ट न्युज पुणे क्राईम न्युज बिबवेवाडी गाड्यांची तोडफोड न्युज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7525058-12-7525058-1591599331736.jpg?imwidth=3840)
पुण्यात टोळक्याचा राडा, बिबवेवाडी केली वाहनांची तोडफोड