ETV Bharat / state

युवास्पंदन अन् सोशल मोदक संस्थेकडून रिक्षाचालकांना मदतीचा हात

author img

By

Published : May 5, 2020, 2:34 PM IST

पुणे शहरात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात आहेत. हजारो रिक्षा चालक पुण्यात रिक्षा चालवून कुटुंब चालवतात. लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून रिक्षा जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील युवास्पंदन आणि सोशल मोदक या संस्थांनी रिक्षा चालकांना प्रत्येकी हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे.

rickshaw drivers
रिक्षाचालकांना मदत

पुणे - सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये 'मध्यमवर्ग' मोठ्या प्रमाणावर भरडला जात असून, त्यांची परिस्थिती बिकट होत आहे. पुणे शहरात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात आहेत. हजारो रिक्षा चालक पुण्यात रिक्षा चालवून कुटुंब चालवतात. लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून रिक्षा जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुण्यातील युवास्पंदन आणि सोशल मोदक या संस्थांनी रिक्षा चालकांना प्रत्येकी हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत 100 रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे. पुण्यातील नागरिकांचा आणि रिक्षाचालकांचा नित्याचा संबंध असतो. नेहमी आपल्या मदतीला धावून येणारे रिक्षाचालक आज अडचणीत आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्याच्या भावनेतून या दोन सामाजिक संस्थांनी 100 रिक्षा चालकांना मदत केली. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर आणखी काही रिक्षाचालकांची माहिती मिळाली. त्यामुळे येत्या आठवडाभरामध्ये आणखी 100 ते 200 जणांना मदत देणार आहोत, अशी माहिती युवस्पंदनचे संस्थापक चेतन धोत्रे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.