ETV Bharat / entertainment

महात्मा गांधींना कमी लेखण्याचा कंगना रणौतचा प्रयत्न, इन्स्टा पोस्टमुळे नवा वाद - Kangana Ranaut controversy

कंगना रणौत यांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. Kangana Ranaut controversy : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे कौतुक करताना 'राष्ट्रपिता' म्हणून गांधींचे महत्त्व कमी लेखले आहे. यामुळे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते आणि भाजपाचे ज्येष्ठ सदस्य मनोरंजन कालिया यांच्याकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Kangana Ranaut
कंगना रणौत (BJP MP Kangana Ranaut (PTI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2024, 1:30 PM IST

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केलेल्या सोशल मीडिया कमेंटमुळे नवा वादाला तोंड फुटले आहे. कंगना यांनी बुधवारी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल पोस्ट लिहिली होती. शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहताना त्यांनी महात्मा गांधींना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असल्याची टीका होत आहे.

दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलही कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर भाजपा खासदार असलेल्या कंगना यांना तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. कंगना यांनी लाल बहादूर शास्त्रींना त्यांच्या 120 व्या जयंतीदिनी एका पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली, ज्यामध्ये राष्ट्रपिता म्हणून गांधींचा दर्जा कमी लेखल्याचं दिसून आलं.

"देश के पिता नहीं, देश के तो लाल होते है. धन्य है भारत मा के ये लाल" असा आशय कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट केला होता. फॉलो-अप पोस्टमध्ये, कंगना यांनी देशात स्वच्छतेचा गांधींचा वारसा पुढे नेण्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं.

शास्त्री आणि गांधी यांच्यावरील पोस्टमुळे हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार असलेल्या कंगना रणैत यांच्यासाठी आणखी एक वादग्रस्त विधान ठरलं आहे. यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी रणौत यांच्यावर गांधींवरील "असंवेदनशील उपहास" केल्याबद्दल टीका केली आहे.

"भाजप खासदार कंगना यांनी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी हा असंवेदनशील उपहास केला. गोडसेपूजक बापू आणि शास्त्री यांच्यात भेद करतात. नरेंद्र मोदी आपल्या पक्षाच्या नवीन गोडसे भक्ताला मनापासून माफ करतील का? या देशाला राष्ट्रपिता आहेत, पुत्रही आहेत आणि हुतात्माही आहेत. प्रत्येकाचा एक सन्मान आहे. ” असं श्रीनाते यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. पंजाबमधील भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांनीही राणौत यांच्या लेटेस्ट वक्तव्यावर टीका केली आहे.

"कंगना रणौत यांनी गांधीजींच्या 155 व्या जयंतीनिमित्त केलेल्या कमेंटचा निषेध करतो. तिच्या छोट्या राजकीय कारकिर्दीत तिला वादग्रस्त विधाने करण्याची सवय लागली आहे," असे कालिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. "राजकारण हे तिचे क्षेत्र नाही. राजकारण हा एक गंभीर विषय आहे. बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे... तिची वादग्रस्त वक्तव्ये पक्षाला अडचणीत आणतात," असे ते पुढे म्हणाले.

2021 मध्ये रद्द करण्यात आलेले तीन शेतीविषयक कायदे परत आणले पाहिजेत अशी मागणी केल्याबद्दल कंगना रणौत यांना मागील महिन्यातच विरोध झाला होता.

जूनमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगना रणौत यांनी आरोप केला की, तीन शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे "भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती" निर्माण होत आहे, आंदोलनाच्या ठिकाणी "मृतदेह लटकत आहेत आणि बलात्कार होत आहेत" असा दावा कंगना यांनी केला होता. यावर चौफेर टीका झाल्यानंतर कंगना यांनी आपले विधान मागे घेतले होते. कंगना या केवळ अभिनेत्री नाहीत तर या देशाच्या जबाबदार नागरिक आणि खासदार आहेत याचं भान त्यांनी कायम बाळगलं पाहिजे अशी टीकाही केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.